Ola Electric Car: भारतात इलेक्ट्रिक कार आणि स्कूटरची मागणी पाहता आता ओला इलेक्ट्रिक देखील आपली इलेक्ट्रिक कार आणण्याच्या तयारीत आहे. कंपनीने गेल्या वर्षी आपली बॅटरीवर चालणारी इलेक्ट्रिक स्कूटर लाँच केली होती. या स्कुटरला मिळालेल्या जबरदस्त प्रतिसादानंतर, आता कंपनी आपली इलेक्ट्रिक कार बाजारात आणणार आहे. खरं तर, सीईओ भाविश अग्रवाल यांनी स्वतः त्यांच्या आगामी इलेक्ट्रिक कारचा एक टीझर व्हिडिओ देखील जारी केला आहे, ज्यामध्ये संकल्पना, मॉडेलचे स्वरूप आणि डिझाइनची झलक दर्शविली आहे. यावरून हे स्पष्ट झाले आहे की कंपनी लवकरच ही इलेक्ट्रिक कार भारतात आणणार आहे.

Ola EV कार आणि स्वस्त बॅटरीसह स्कूटर लवकरच लॉन्च होणार

१९ जून रोजी, कंपनीने तामिळनाडूमधील ओला फ्युचरफॅक्टरी येथे कारखान्याला भेट देण्याच्या निमित्ताने या कारचा टीझर रिलीज केला आहे. अधिक माहितीनुसार, कंपनी दोन इव्ही मॉडेल्सवर काम करत आहे, जी एक एसयूव्ही असेल आणि दुसरी सेडान असेल. या कार्स २०२३ च्या अखेरीस भारतात लाँच होतील. यासोबतच कंपनी स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर देखील आणण्याच्या तयारीत आहे.

Market Technique Stock Market
बाजाराचा तंत्र-कल : शेअर बाजाराला बाळसं की सूज?
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
majority of bird species in india face decline
देशातील पक्ष्यांच्या संख्येत लक्षणीय घट; जाणून घ्या, मानवी चुका किती हानीकारक
A bull attacked a scooter driver who came under the truck viral video on social media
बैलाने मारली उडी अन् स्कूटर चालक गेला ट्रकच्या खाली, पुढे नेमकं काय घडलं? पाहा धक्कादायक VIDEO
Matheran Mini Toy Train , Mini Train Vistadome Coach,
माथेरानच्या राणीचा ‘विस्टाडोम’विनाच प्रवास
india railway viral news Husband-Wife Fight
नवरा-बायकोतील भांडण अन् रेल्वेचे तीन कोटींचे नुकसान! OK मुळे चुकीच्या स्थानकावर पोहोचली ट्रेन; नेमकं घडलं काय? वाचा…
Royal Enfield electric bike breaks cover globally royal enfield electric bike price features latest update
Royal Enfield ची पहिलीवहिली इलेक्ट्रीक बाईक लाँच; जबरदस्त लूक, फिचर्स अन् किंमत लगेच जाणून घ्या
Kitchen jugad video orange peel and milk scrub for tanning skin
Kitchen Jugaad: दुधात संत्र्याची साल टाकताच कमाल झाली; Video पाहाल तर दररोज कराल हा उपाय

ओला इलेक्ट्रिक कारचे डिझाइन कसे असेल ?

टीझर व्हिडिओनुसार, ओला इलेक्ट्रिक कारचे डिझाईन खूपच भविष्यवादी दिसते. नवीन आणि अत्याधुनिक फीचर्ससोबत याला मोठी रेंजही दिली जाईल असे मानले जात आहे. स्लीक एलईडी हेडलॅम्प, स्लोपी विंडशील्ड आणि स्पोर्टी अलॉय व्हील ओला इलेक्ट्रिक कारमध्ये दिसतील. त्याच वेळी, समोरच्या ग्रिल आणि दरवाजाच्या हँडल्सची अनुपस्थिती दिसून येते. ई-कारमधील एलईडी लाईट्स व्यतिरिक्त, या कारचा कॉम्पॅक्ट आकार केबिनमध्ये सादर केला जाईल अशी अपेक्षा आहे. कारसोबत टॅबलेटसारखी टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम दिली जाऊ शकते. त्याच वेळी, याशिवाय, कारला स्पोर्टी सीट आणि ३६०डिग्री ग्लास पॅनेल मिळण्याची अपेक्षा आहे ज्यामुळे केबिन प्रशस्त दिसते. कंपनी कारला स्पोर्टी बोनफायर व्हील्स देऊ शकते.