Driving Tips in Monsoon : देशाच्या विविध भागात पावसाचा जोर कायम आहे. अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू आहे. मुसळधार पावसामुळे रस्त्यावर पाणी साचलेले दिसत आहे. जर तुमच्याजवळ कार असेल तर रस्त्यावर साचलेल्या पाण्यातून कार चालवू नका नाहीतर तुमचे लाखोंचे नुकसान होऊ शकते. अनेकदा लोकांना याविषयी माहिती नसते आणि नंतर त्यांना पश्चाताप होतो. आज आपण त्याविषयी सविस्तर जाणून घेऊ या. (note down tips while driving car on waterlogged Road in rainy season)

पाणी साचलेल्या रस्त्यावर गाडी चालवली तर गाडी पाण्यात अडकू शकते

अनेकदा आपण पाहतो की मुसळधार पावसात सुद्धा लोक रस्त्यावर साचलेल्या पाण्यातून भरधाव वेगाने गाडी चालवतात. किंवा पावसाच्या पाण्यात अडकलेली कार बाहेर काढण्याचा प्रयत्न करतात पण असे करू नका. तुमची एक लहान चूक महागात पडू शकते. जर तुम्ही पाणी साचलेल्या रस्त्यावर गाडी चालवली तर तुमची गाडी पाण्यात अडकू शकते पण अनेक कार चालक ही चूक करतात आणि मग कारचे मोठे नुकसान होते.

हेही वाचा : Top 5 Best-Selling Motorcycle Brands : ‘या’ ५ मोटरसायकल ब्रँडने जून २०२४ मध्ये केली सर्वाधिक विक्री, रॉयल एनफिल्डच्या विक्रीत घट

पर्यायी रस्त्याचा वापर करा

जर तुमच्याजवळ कार आहे आणि रस्त्यावर पाणी साचले आहेत तर प्रयत्न करा की त्या रस्त्याने न जाता पर्यायी रस्त्याचा वापर करा आणि जर तुमच्याकडे कोणता दुसरा पर्याय नसेल तर रस्त्यावरील पाण्यातून कार खूप वेगाने काढू नका. पाणी साचलेल्या रस्त्यावर कारला एक्सलेरेट केल्यामुळे गाडीचे नुकसान होऊ शकते. त्याचबरोबर गाडीचे तोल बिघडू शकते. अशावेळी कार नेहमी हळूवार चालवा.

हेही वाचा : Tata Punch vs Hyundai Exter: बजेटमधील SUV निवडण्यात होतोय गोंधळ? टाटा पंच व ह्युंदाईचे फीचर्स, किंमत पाहा; कोणती बेस्ट ते ठरवा!

एक लहान चूक महागात पडू शकते

पावसाळ्यात अनेकदा अंडरपासमध्ये पाण्याची पातळी वाढते. अशावेळी आपली कार पाण्यामध्ये घेऊन जाण्यापूर्वी पाण्याची पातळी तपासा. जर पाणी कारच्या इंजिनमध्ये गेले तर मोठा खर्च भरावा लागू शकतो. याशिवाय थोडा निष्काळजीपणा केला तर गाडी पाण्याखाली सुद्धा जाऊ शकते. जर रस्त्यावर पाण्याची मात्रा जास्त असेल तर गाडी वेगाने रस्त्यावरून चालवू नका. असे केल्यामुळे कारचे ब्रेकसुद्धा खराब होऊ शकतात.