संपूर्ण जगभरात इलेक्ट्रिक वाहनांचा बोलबाला सुरू आहे. देशात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढली असून याच्या विक्रीतही मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. हेच पाहता अनेक दिग्गज वाहन निर्माता कंपनी आपले वाहन इलेक्ट्रिक स्वरूपात बाजारात उतरवत आहे. आता ही परिस्थिती पाहता रॉयल एनफिल्ड ने इलेक्ट्रिक कार सेगमेंट मध्ये प्रवेश केला आहे. रॉयल एनफिल्डने आपल्या इलेक्ट्रिक बाईकची चाचणी देखील सुरू केली आहे. २०२५ मध्ये एनफिल्ड आपली इलेक्ट्रिक बाईक सादर करू शकते, अशी माहिती कंपनीने दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

इलेक्ट्रिक बाईक ‘अशी’ असेल खास

सध्या कंपनीचे सर्वाधिक लक्ष इलेक्ट्रिक बाईकचा बेस तयार करण्यामध्ये आहे. त्याचबरोबर कंपनी आपल्या ग्राहकांना इलेक्ट्रिक बाईक बेस्ट पावर आणि रेंज सोबत प्रस्तुत करणार आहे. त्यामुळे रॉयल एनफिल्डच्या इलेक्ट्रिक बाईक मध्ये सर्वोत्तम बॅटरी क्षमता असल्याची अपेक्षा केली जाऊ शकते.
रॉयल एनफील्डची इलेक्ट्रिक बाईक सिंगल चार्जमध्ये १०० ते १५० किमीपर्यंतची रेंज देईल. या बाईकच्या क्षमतेबाबत बोलायचं झाल्यास ही बाईक ३५० सीसी पोर्टफोलिओमध्ये असेल.

आणखी वाचा : फक्त ६० हजारांत घरी आणा मारुतीची ‘ही’ कार; भरावा लागेल ‘इतका’ ईएमआय

मीडिया रिपोर्टनुसार, रॉयल एनफिल्ड आपल्या इलेक्ट्रॉनिक बाईक तीन व्हेरियंट मध्ये लाँच करू शकते. यामध्ये Meteor 350, Classic 350 आणि Hunter 350 यांचा समावेश असू शकतो. कंपनी या तीन व्हेरीयंटच्या नवीन तंत्रज्ञानावर काम करत आहे.

काही दिवसांपूर्वी रॉयल एनफिल्डचे Royal Enfield Meteor 350 हे व्हेरियंट डिजिटल प्लॅटफॉर्मवर दिसले होते. परंतु याबद्दल कंपनीकडून अजूनही कोणती अधिकृत माहिती मिळालेली नाही. मीडिया रिपोर्टनुसार, पुढील पाच वर्षात कंपनी इलेक्ट्रिक वाहनांच्या निर्मितीसाठी दोन हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची योजना आखत आहे.