इलेक्ट्रिक वाहने फक्त पर्यावरणासाठीच उपयुक्त आहेत असे नव्हे तर पारंपारिक वाहनांपेक्षा अधिक सुविधायुक्तदेखील आहेत. याशिवाय पेट्रोल, डिझेलसारख्या इंधनांच्या वाढलेल्या किंमतीमुळे ग्राहकांचे लक्ष इलेक्ट्रिक वाहनांकडे अधिक वळले आहे. इलेक्ट्रिक वाहने यादृष्टीने स्वस्त आहेत इतकेच नाही तर भारतात इलेक्ट्रिक वाहन खरेदी केल्यास टॅक्सवरदेखील फायदे मिळत आहेत.
इलेक्ट्रिक वाहनांसाठी कर्जावर टॅक्समध्ये सवलत
यासाठी सरकारने नवीन विभाग तयार केला आहे. ज्यामध्ये या वाहनांसाठी जारी केलेल्या कर्जावर ८०ईईबी अंतर्गत कर सूट दिली जाईल. येथे ग्राहकांना इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर १,५०,००० रुपयांपर्यंत आयकर वाचवण्याची संधी मिळेल. येथे हे लक्षात घेणे आवश्यक आहे की ही सूट केवळ कर्जाच्या व्याजावर उपलब्ध आहे आणि कर्जाच्या मूळ रकमेवर नाही.
आणखी वाचा : अर्रर… महिंद्राच्या ‘या’ कारमध्ये आढळला मोठा दोष…! कंपनीने मागवली कार परत, आता होणार ‘हा’ नवीन बदल
असा मिळवा फायदा
इलेक्ट्रिक वाहन खरेदी करण्यासाठी, तुम्हाला कोणत्याही वित्तीय संस्था किंवा बिगर बँकिंग वित्तीय कंपनीकडून कर्ज घेणे आवश्यक आहे. हे कर्ज १ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०३२ दरम्यान कधीही मंजूर केले गेले असावे.
कोणाला मिळेल फायदा?
केवळ वैयक्तिक करदाते ही सूट घेऊ शकतात. या कपातीसाठी अन्य कोणताही करदाता पात्र नाही. म्हणजेच, एचयुएफ, एओपी, भागीदारी फर्म, कंपनी किंवा इतर कोणत्याही प्रकारचे करदाते या सूटचा लाभ घेऊ शकत नाहीत. तुम्ही या सवलतीचा लाभ एकदाच घेऊ शकता.