Oben Electric Rorr EZ Launched Date Confirm: दिवसेंदिवस भारतात इलेक्ट्रिक बाईकची मागणी वाढू लागली आहे. पण, या इलेक्ट्रिक दुचाकींना आग लागणे, त्यांचा स्फोट होणे आदी घटनाही दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. तर त्यावर उपाय म्हणून एक कंपनी खास तंत्रज्ञानासह मार्केटमध्ये लवकर उतरणार आहे. कारण- इलेक्ट्रिक वाहनांसह त्यामधील बॅटरीदेखील खूप चर्चेत असते. इलेक्ट्रिक वाहनांचा परफॉर्मन्स, सुरक्षा आणि त्यांची किंमत या गोष्टी त्या वाहनामध्ये वापरण्यात आलेल्या बॅटरीवरून ठरवल्या जातात.
हे लक्षात घेता, भारतीय इलेक्ट्रिक बाईक निर्माता ओबेन इलेक्ट्रिकने (Oben Electric) त्यांच्या आगामी मोटरसायकलचा टीझर रिलीज केला आहे. या मोटरसायकलचे नाव (Oben Electric Rorr EZ) असं आहे. तसेच ७ नोव्हेंबर रोजी ही मोटरसायकल लाँच होणार आहे; ज्याचा उद्देश दैनंदिन प्रवासात बदल घडवून आणणे हा आहे. कारण- ही मोटरसायकल नवीन फीचर्ससह दाखल होणार आहे.
ओबेन इलेक्ट्रिक (Oben Electric Rorr EZ)
Oben Electric Rorr EZ एक नवीन प्रकारची बाईक आहे; जी बाईक चालविताना येणार्या सामान्य समस्यांवर उपाय शोधता येऊ शकेल अशा रीतीने डिझाइन केलेली आहे. या बाईकमध्ये एक खास एलपीएफ म्हणजे लिथियम आयर्न फॉस्फेट (LFP) बॅटरी तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे. ही बॅटरी उष्णता सहन करण्याची क्षमता, टिकाऊपणा आणि भारताच्या विविध हवामानात विश्वसनीयतेसाठी ओळखली जाणार आहे. त्यामुळे Rorr EZ बाईक चालविण्यासाठी सुरक्षिततेला प्राधान्य देत आहे एवढे नक्की.
ही कंपनी रिसर्च ॲण्ड डेव्हलपमेंटपासून ते बॅटरी, मोटर्स, कंट्रोल युनिट्स, फास्ट चार्जर यांसारख्या प्रमुख घटकांच्या निर्मितीपर्यंत संपूर्ण गोष्टींची जबाबदारी घेते. हे उत्पादन अचूकता, गुणवत्ता आणि बाजारातील बदलांनुसार झटपट जुळवून घेते आणि विक्रीनंतरचा सपोर्टदेखील ग्राहकांना ऑफर केला जातो, असे कंपनीचे म्हणणे आहे.
ओबेन इलेक्ट्रिकची (Oben Electric) स्थापना ऑगस्ट २०२० मध्ये बंगळुरूमध्ये झाली. ही कंपनी संशोधन आणि विकासावर लक्ष केंद्रित करते. तसेच ही कंपनी इलेक्ट्रिक मोटरसायकल निर्मितीत तज्ज्ञ आहे. या कंपनीकडे इलेक्ट्रिक वाहन संशोधनाचा २५ वर्षांपेक्षा अधिक अनुभव आहे. Oben Electric चा उद्देश भारताच्या इलेक्ट्रिक दुचाकी बाजारात बदल घडवणे हा आहे. त्यामुळे त्यांनी LFP सारख्या प्रगत बॅटरी तंत्रज्ञानावर भर दिला आहे; ज्यामुळे ग्राहकांची सुरक्षा वाढते.