बेंगळुरू बेस्ट ओबेन इलेक्ट्रिकने भारतात आपली पहिली इलेक्ट्रिक बाइक Rorr लॉन्च केली आहे. महाराष्ट्रात या इलेक्ट्रिक बाइकची एक्स-शोरूम किंमत ९९,९९९ रुपये आहे. ओबेन इलेक्ट्रिकचा दावा आहे की, ही बाईक एका चार्जमध्ये २०० किमी पर्यंतची रेंज देऊ शकते. कंपनीच्या मते, त्याची किंमत, तीन वर्षांची वॉरंटी आणि ड्रायव्हिंग रेंज भारतातील ग्राहकांना आकर्षित करेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ही बाईक भारतात बनवली आहे
ओबेनचा दावा आहे की, रॉर बाईक भारतातच डिझाईन, विकसित आणि तयार केली गेली आहे. यासोबतच ओबेनने १५ मार्चपासून रोर इलेक्ट्रिक बाइकचे ऑनलाइन प्री-बुकिंग सुरू केले आहे. ही बाईक केवळ ९९९ रुपयांच्या टोकन रकमेवर बुक केली जाऊ शकते.

Rorr बाईकची किंमत
ओबेन इलेक्ट्रिकची Rorr बाईक तीन रंगात लॉन्च करण्यात आली आहे. या बाइकची किंमत राज्यानुसार बदलते. ही बाईक दिल्लीत ९४,९९९ रुपये, महाराष्ट्रात ९९,९९९ रुपये, गुजरातमध्ये १,०४,९९९ रुपये, राजस्थानमध्ये १,१४,९९९ रुपये आणि कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणामध्ये १,२४,९९९ रुपयांना खरेदी केली जाऊ शकते.

आणखी वाचा : आता गाडीच्या इंजिनमध्ये पाणी गेलं तरी अडचण नाही, ही ऑटो कंपनी देणार कव्हर

Rorr बाईक बॅटरी
ओबेन इलेक्ट्रिकने या बाईकमध्ये 4.4kwh ची लिथियम आयन बॅटरी पॅक केली आहे, जी २ तासात पूर्ण चार्ज होते. ही बाईक एका चार्जमध्ये २०० किमी चालवता येते. दुसरीकडे, रुर बाईक ०-४० किमीचा वेग ३ सेकंदात पकडू शकते आणि ही बाईक ताशी १०० किमी वेगाने धावू शकते.

रॉर बाईकची फिचर्स
ओबेन रॉर बाईकमध्ये राइड डिटेल्स, बॅटरी स्टेटस, जिओ फेन्सिंग, जिओ टॅगिंग, बॅटरी थेफ्ट प्रोटेक्शन आणि चार्जिंग स्टेशन लोकेटर यांसारखी फिचर्स मिळतील. रायडर्सना एक संयुक्त ब्रेकिंग सिस्टम आणि ड्रायव्हर अलर्ट सिस्टम देखील मिळेल जी व्हिज्युअल आणि ऑडिओ संकेत प्रदान करते, वाहन केव्हा चालू आहे, स्थिर आहे किंवा देखभालीची गरज आहे हे दर्शवते.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Oben rorr electric bike with many features like geo fencing launched prp