Oben starts deliveries of Rorr e-motorcycle in Bengaluru: इलेक्ट्रिक टू-व्हीलर बनवणारी बेंगळुरू स्थित स्टार्ट-अप कंपनी ओबेन इलेक्ट्रिकने आपल्या ईव्हीची डिलिव्हरी सुरू केली आहे. कंपनीने इलेक्ट्रिक ओबेन रॉर बाइकचे पहिले २५ युनिट वितरित केले. ओबेन इलेक्ट्रिकने या रविवारी बंगलोरमधील जिगानी प्लांटमध्ये एका कार्यक्रमाचे (F2R-फर्स्ट टू रोअर) आयोजन केले. कार्यक्रमादरम्यान, कंपनीने ओबेन रोर ईव्हीची पहिली बॅच खरेदीदारांना दिली.

देशभरात बाईक चार्जिंगसाठी १२,००० हून अधिक स्टेशन

ओबेन इलेक्ट्रिकने बेंगळुरू येथील एका कार्यक्रमात आपल्या पहिल्या २५ ग्राहकांना नवीन ओबेन रॉर बाइक्स सुपूर्द केल्या. कंपनीची ही इलेक्ट्रिक बाईक केवळ ३ सेकंदात ० ते ४० किलोमीटरचा वेग पकडण्यास सक्षम आहे. कंपनी आपल्या ग्राहकांना या ईव्हीवर पहिल्या वर्षी ३ मोफत सेवा देते, यासोबतच ५०,००० किमी प्रति ३ वर्षांची वॉरंटी ५ वर्षांसाठी ७५,००० किमीपर्यंत वाढवता येते. कंपनी आपल्या ग्राहकांना रस्त्याच्या कडेला मोफत सहाय्य देत आहे आणि बाईक चार्ज करण्यासाठी देशभरात १२,००० पेक्षा जास्त चार्जिंग स्टेशन देखील प्रदान करत आहे.

karan arjun salman and shah rukh khan blockbuster movie re releases
‘मेरे करन अर्जुन आएंगे…’, ३० वर्षांनी पुन्हा प्रदर्शित होणार ब्लॉकबस्टर चित्रपट! सलमान खानने जाहीर केली तारीख…
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर…
The new Jio Diwali offers are valid until 5 November 2024
Jio Diwali Dhamaka Offer : जिओच्या ‘या’ दोन रिचार्जवर मिळणार डिस्काउंट कूपन; ३,३५० रुपयांच्या फायद्यासाठी कूपन कसं मिळवायचं ते बघा
Petrol Diesel Price Changes
Petrol Diesel Price Changes : पेट्रोल-डिझेलच्या दरात घसरण? वाचा किती रुपयांनी कमी झाला इंधनाचा दर
Snack materials became expensive, Snack,
फराळाचे साहित्य महागले
Diwali Discount On Aprilia Bike
Diwali Discount On Aprilia Bike : झिरो डाउन पेमेंट, तीन वर्षांची वॉरंटी आणि बरंच काही… दिवाळीत ही खास बाईक खरेदी करण्याची तुमच्याकडे संधी
The action taken by the Maharashtra Pollution Control Board against the Mercedes Benz company is controversial Pune news
शहरबात: मर्सिडीज बेंझ, राज्यातील उद्योग पलायन अन् शासकीय यंत्रणा…
Petrol and diesel price On 24th October
Daily Fuel Rates : महाराष्ट्रातील पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर! चेक करा तुमच्या शहरांतील आजचा भाव काय असणार?

(हे ही वाचा : नवीन कार खरेदी करताय? मारुतीच्या ‘या’ स्वस्त गाड्यांवर मिळतोय बम्पर डिस्काउंट, होणार पैशांची बचत)

Oben Rorr EV: ई-बाईकमध्ये अनेक स्मार्ट फीचर्स

ही बाईक फक्त २ तासात पुर्ण चार्ज होईल. oben rorr ही बाइक फुल चार्ज झाल्यावर तब्बल १८७ किलोमीटरचं अंतर गाठू शकते. ओबेन रोर इलेक्ट्रिक बाईकची विक्री या वर्षी मे महिन्यात बेंगळुरूमध्ये सुरू करण्यात आली होती. कंपनीच्या म्हणण्यानुसार, ओबेन रॉर ईव्हीच्या विक्रीच्या प्रमुख घटकांमध्ये १५०cc पेट्रोल बाईकपेक्षा चांगली कामगिरी, ईव्हीची नवीन-युगाची रचना आणि त्यात दिलेली स्मार्ट वैशिष्ट्ये यांचा समावेश आहे.