Odysse Electric Vehicles: ओडीसी इलेक्ट्रिक वेईकल्स या भारतातील झपाट्याने विकसित होणाऱ्या प्रिमिअम इलेक्ट्रिक वेईकल उत्पादक कंपनीने फ्लिपकार्टसोबत भागीदारी करत ई-कॉमर्स विश्वामध्ये केला प्रवेश केला आहे. या सहयोगाचा देशभरातील ग्राहकांना ओडीसीच्या नाविन्यपूर्ण व अत्याधुनिक इलेक्ट्रिक बाइक्स आणि स्कूटर्सची श्रेणी प्री-बुक व खरेदी करण्यासाठी एकसंधी व त्रासमुक्त अनुभव, तसेच अद्भुत लाँच ऑफर्स देण्याचा मनसुबा आहे.
ओडीसी उत्पादनांच्या संपूर्ण श्रेणीमध्ये लोकप्रिय मॉडेल्सचा समावेश आहे, जसे ७ इंच अँड्रॉईड डिस्प्ले असलेली भारतातील पहिली मोटरबाइक – वेडर, स्पोर्टी ई-बाइक – इव्होकिस, हॉक प्लस सारख्या हाय स्पीड इलेक्ट्रिक स्कूटर्स आणि रेसर लाइट व्ही२ व ई२गो लाइट यांसारख्या लो स्पीड स्कूटर्स आणि त्यांचे व्हेरिएण्ट्स. या सहयोगासह कंपनीचा भारतभरातील ग्राहकांच्या नाविन्यपूर्ण इलेक्ट्रिक मोबिलिटी सोल्यूशन्स अंगिकारण्याच्या पद्धतीमध्ये क्रांतिकारी बदल घडवून आणण्याचा उद्देश आहे.
ओडीसी इलेक्ट्रिक वेईकल्स ऑनलाइन, मोबाईल व फिजिकल डिलरशिप्स अशा विविध माध्यमांच्या माध्यमातून सातत्यपूर्ण व एकीकृत अनुभव देण्याचा प्रयत्न करते. फ्लिपकार्टची पोहोच, ग्राहकांबाबत माहिती आणि ऑनलाइन मार्केटप्लेस अनुभवासह ओडीसी ग्राहकांना ओडीसीच्या इलेक्ट्रिक वेईकल्सची संपूर्ण श्रेणी सुलभपणे उपलब्ध करून देण्यास उत्सुक आहे.
(हे ही वाचा : Mercedes-Benz GLE चे धाबे दणाणले, BMW ची SUV कार नव्या अवतारात देशात दाखल, किंमत पाहून व्हाल थक्क )
या सहयोगासह ग्राहक ओडीसीच्या इलेक्ट्रिक बाइक्स व स्कूटर्सच्या वैविध्यपूर्ण लाइन-अपचा शोध घेण्यासोबत खरेदी करू शकतात. या श्रेणीमध्ये नाविन्यपूर्ण डिझाइन, प्रगत तंत्रज्ञान व अपवादात्मक कार्यक्षमता समाविष्ट आहे. भारतीय रस्त्यांवर ड्राइव्ह करण्यासाठी परिपूर्ण स्टायलिश व सर्वोत्तम स्कूटर्सपासून थरारक ड्रायव्हिंग अनुभवांसाठी डिझाइन करण्यात आलेल्या शक्तिशाली व प्रबळ बाइक्सपर्यंत ओडीसीची उत्पादन श्रेणी विविध पसंती व आवश्यकतांची पूर्तता करते.
या घोषणेबाबत आपले मत व्यक्त ओडीसी इलेक्ट्रिक वेईकल्स प्रा. लि.चे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. नेमिन वोरा म्हणाले, ”आजच्या तंत्रज्ञान संचालित युगामध्ये ई-कॉमर्स समाजाच्या सर्व विभागांमधील अधिकाधिक ग्राहकांपर्यंत पोहोचण्याकरिता प्रबळ साधन म्हणून उदयास आले आहे.
(हे ही वाचा : ६ एअरबॅग्ज असणाऱ्या कारवर तुटून पडले ग्राहक, २४ तासांत १३,४२४ लोकांनी केली बुकींग, शोरुम्ससमोर लागल्या रांगा )
फ्लिपकार्टसोबतचा आमचा सहयोग आमची पोहोच अधिकाधिक ग्राहकांपर्यंत वाढवण्यासाठी, तसेच त्यांना इलेक्ट्रिक मोबिलिटी व शाश्वत तंत्रज्ञानामधील आधुनिक सुधारणा सहजपणे उपलब्ध करून देण्यासाठी धोरणात्मक पाऊल आहे. ई-कॉमर्सची सुविधा व उपलब्धतेचा लाभ घेत आमचा अधिकाधिक व्यक्तींना आधुनिक काळातील इलेक्ट्रिक मोबिलिटीचा अवलंब करण्यास सक्षम करण्याचा उद्देश आहे, ज्यामुळे उज्ज्वल व अधिक शाश्वत भविष्याच्या दिशेने वाटचाल सुरू होईल.”
ओडीसी व फ्लिपकार्ट इलेक्ट्रिक दुचाकींच्या विनासायास खरेदीसाठी विशेष डिल्स, सूट व आकर्षक फायनान्सिंग योजना प्रदान करतील.