ओडीसी इलेक्ट्रिक वेईकल्‍स त्‍यांच्‍या उच्‍च प्रशंसित इलेक्ट्रिक स्‍कूटरसाठी बड-ई कडून १०,००० युनिट्सच्‍या ऑर्डरसह मोठ्या यशाला साजरे करत आहे. डिलिव्‍हरी पुढील दोन वर्षांमध्‍ये टप्‍प्‍याटप्‍प्‍याने पूर्ण करण्‍यात येईल. या धोरणात्‍मक सहयोगामधून दोन्‍ही कंपन्‍यांची कार्बनचे प्रमाण कमी करण्‍याप्रती आणि शून्‍य उत्‍सर्जन संपादित करण्‍याचे राष्‍ट्रीय ध्‍येय संपादित करण्‍यामध्‍ये योगदान देण्‍याप्रती कटिबद्धता दिसून येते.

हा धोरणात्‍मक सहयोग ओडीसीसाठी महत्त्वाचा टप्‍पा आहे, जेथे कंपनीने इलेक्ट्रिक स्‍कूटर बाजारपेठेतील आपली उपस्थिती अधिक दृढ करण्‍याचे कार्य सुरूच ठेवले आहे. अपवादात्‍मक कार्यक्षमता, अत्‍याधुनिक तंत्रज्ञान आणि पर्यावरणदृष्‍ट्या जागरूक डिझाइन या वैशिष्‍ट्यांमुळे इलेक्ट्रिक स्‍कूटरला व्‍यापक मान्‍यता मिळाली आहे, तसेच आधुनिक शहरी प्रवाशांसाठी पसंतीची निवड बनली आहे. हा सहयोग स्‍केलेबिलिटी व खर्च बचतींसह बड-ई ला उल्‍लेखनीय फायदे देईल, तसेच त्‍यांना बाजारपेठेत स्‍पर्धात्‍मक फायदा मिळवण्‍यास मदत होईल.

Mangal Gochar 2024
पुढील १२९ दिवस मंगळ करणार मालामाल; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना मिळणार बक्कळ पैसा अन् प्रत्येक कामात यश
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
IPL 2025 Mega Auction Jofra and Archer Cameron Green not shortlisted
IPL 2025 : जोफ्रा आर्चर-बेन स्टोक्ससह ‘या’ पाच दिग्गज खेळाडूंवर महालिलावात लागणार नाही बोली, जाणून घ्या कारण
Toyota has launched the special edition versions For year end
Toyota Year End Deals : टोयोटाच्या तीन गाड्यांचे लिमिटेड एडिशन लाँच; कारच्या खरेदीवर मिळणार भरपूर अ‍ॅक्सेसरीज
Vodafone Idea reduces data benefits in 23 rupees prepaid plan
Vodafone Idea Prepaid Plan: वोडाफोन आयडियाच्या २३ रुपयांच्या प्लॅनमध्ये झाला बदल; आता मिळेल ‘इतका’ डेटा; घ्या जाणून
Shocking accident a young man riding a scooter with his phone collided with a car video viral
VIDEO: असा भयंकर अपघात कधीच पाहिला नसेल! स्कूटर चालवता चालवता कारला आदळला अन्…, पुढे तरुणाबरोबर जे झालं ते पाहून उडेल थरकाप
New Maruti Suzuki Dzire cheapest model price its features Engine and design
New Maruti Suzuki Dzire: मारुतीच्या नवीन डिझायरला मोठी पसंती, सगळ्यात स्वस्त मॉडेल घेण्यासाठी ग्राहकांची लागली रांग

याप्रसंगी आपले मत व्‍यक्‍त करत ओडीसी इलेक्ट्रिक वेईकल्‍स प्रा. लि. चे मुख्‍य कार्यकारी अधिकारी श्री. नेमिन वोरा म्‍हणाले, ”आम्‍हाला आमच्‍या इलेक्ट्रिक स्‍कूटर्ससाठी बड-ई सोबत सहयोग करण्‍याचा आनंद होत आहे. या सहयोगामधून शाश्‍वत परिवहन सोल्‍यूशन्‍सप्रती वाढती मागणी आणि ओडीसीची उच्‍च दर्जाच्‍या इलेक्ट्रिक वेईकल्‍स प्रदान करण्‍याप्रती कटिबद्धता दिसून येते, जेथे कार्यक्षमता व पर्यावरणीय प्रभावाला प्राधान्‍य देण्‍यात आले आहे.”

(हे ही वाचा : मारुती, टाटाचा खेळ खल्लास करायला महिंद्रा आणतेय नव्या अवतारात स्वस्त ९ सीटर कार, किंमत… )

ओडीसी ग्राहक समाधानाला प्राधान्‍य देण्‍यासह इलेक्ट्रिक स्‍कूटर्सच्‍या १०,००० युनिट्ससाठी एकसंधी डिलिव्‍हरी प्रक्रियेची खात्री घेण्‍याप्रती समर्पित आहे. तसेच, कंपनी सर्वसमावेशक विक्री-पश्‍चात्त साह्य, तसेच देखरेख सेवा आणि सुसज्‍जरित्‍या उपलब्‍ध स्‍पेअर पार्टस् प्रदान करण्‍याप्रती कटिबद्ध आहे, ज्‍यामधून कंपनी आणि तिच्‍या ग्राहकांसाठी सुलभ मालकीहक्‍क अनुभवाची खात्री घेतली जाते.

बड-ई सोबतचा हा सहयोग ओडीसीसाठी महत्त्वाचा टप्‍पा आहे, ज्‍यामधून शाश्‍वत गतीशीलता सोल्‍यूशन्‍सची अग्रणी प्रदाता म्‍हणून कंपनीचे स्‍थान अधिक दृढ होते. नाविन्‍यपूर्ण व पर्यावरणास-अनुकूल उत्‍पादने प्रदान करत ओडीसी व्‍यक्‍तींच्‍या प्रवास करण्‍याच्‍या पद्धतीमध्‍ये क्रांतिकारी बदल घडवून आणत आहे आणि शुद्ध व हरित विश्‍वाप्रती योगदान देत आहे.

ओडीसी इलेक्ट्रिक वेईकल्‍स प्रा. लि. बाबत

मुंबई स्थित इलेक्ट्रिक वेईकल स्‍टार्ट-अप ओडीसी वोरा ग्रुप ऑफ कंपनीजचा भाग आहे. ऑल-इलेक्ट्रिक मोबिलिटी व्‍यासपीठाने ग्राहकांसाठी इंटेलिजण्‍ट अर्बन इलेक्ट्रिक मोबिलिटीच्‍या नवीन युगामध्‍ये प्रगती करण्‍यासाठी जगातील अग्रणी ई.व्‍ही. घटक उत्‍पादक व गतीशीलता तंत्रज्ञान स्‍पेशालिस्‍ट्ससोबत सहयोग केला आहे. कंपनीच्‍या इलेक्ट्रिक स्‍कूटर्स व बाइक्‍स तरूणांपासून वृद्धांपर्यंत, फॅशनेबल खरेदीदार व आरामदायीपणाचा शोध घेणाऱ्यांपासून व्‍यस्‍त व्‍यावसायिक राइडर्सपर्यंत सर्वांसाठी उपलब्‍ध आहेत. प्रत्‍येक उत्‍पादन टिकाऊपणा व विश्‍वासार्हता चाचण्‍यांचे पालन करते. ओडीसी प्रत्‍येक ग्राहकाला किफायतशीर दरामध्‍ये दर्जा, आरामदायीपणा व स्‍टाइलचे सर्वसमावेशक पॅकेज देते.