Hyundai Car Discounts In March 2025 : एका ठिकाणाहून दुसरीकडे लगेच पोहोचण्यासाठी जेव्हा खूप धडपड करावी लागते. तेव्हा आपल्या तोंडून लगेच निघते “माझी स्वत:ची कार असती, तर बरं झालं असतं.” पण, ही कार घेताना बजेटसुद्धा बघावे लागते. अनेकदा आपली स्वप्नातील कार आपल्या बजेटपेक्षा महाग असते. त्यामुळे आपण सेकंड हँड गाडी घेण्याच्या विचाराकडे आपण वळतो किंवा मग एखाद्या सणानिमित्त डिस्काउंटची वाट पाहतो. तर, आता नवीन कार खरेदी करणाऱ्यांसाठी एक सुवर्णसंधी चालून आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मार्च महिन्याची सुरुवात झाली आहे आणि कार निर्माता कंपनी ह्युंदाई त्यांच्या जबरदस्त वाहनांवर सवलत देत आहेत. ह्युंदाई त्यांच्या Venue, Exter, Verna व Grand i10 Nios आदी काही मॉडेल्सवर डील ऑफर करते आहे. त्यामध्ये काही कार ६८ हजार रुपये सवलतींसह मिळत आहेत…

मार्च २०२५ मध्ये ह्युंदाई ऑफर करीत असलेल्या कार्सबद्दलची माहिती पुढीलप्रमाणे…

१. ह्युंदाई एक्सटर (Hyundai Exter) –

ह्युंदाई एक्सटर ही कार कंपनीच्या नवीन कार्सपैकी एक आहे आणि Grand i10 Nios प्लॅटफॉर्मवर आधारित एंट्री-लेव्हल एसयूव्ही ऑफर करते. मार्च २०२५ मध्ये ह्युंदाई Exter ४५ हजार किमतीचे फायदे ऑफर करते आहे, जे संपूर्ण महिनाभर वैध असणार आहेत. ह्युंदाई Exter मध्ये 82bhp १.२ लिटर पेट्रोल इंजिन मॅन्युअल किंवा AMT गिअरबॉक्सशी जोडलेले आहे आणि त्यात सीएनजी पर्यायदेखील आहे.

२. ह्युंदाई व्हेन्यू (Hyundai Venue) –

ह्युंदाई व्हेन्यू एसयूव्ही टाटा नेक्सॉन, किआ सॉनेट, महिंद्रा XUV3X0 शी स्पर्धा करते. ह्युंदाई खरेदी केल्यास तुम्हाला ४५ हजार रुपयांची सवलत मिळेल. ह्युंदाई Venue मध्ये 82bhp 1.2-लीटर पेट्रोल इंजिन, 118bhp 1.0-लिटर टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन किंवा 112bhp डिझेल असू शकते.

३. ह्युंदाई ग्रँड आय १० निओस (Hyundai Grand i10 Nios) –

The Grand i10 Nios या कारसाठी कंपनी सर्वाधिक सवलत म्हणजे ६८,००० रुपये सवलत देत आहे. या कारमध्ये तुम्हाला १.२ लीटर पेट्रोल इंजिनद्वारे समर्थित आहे जे 82bhp आणि ५ स्पीड मॅन्युअल किंवा AMT गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. Hyundai देखील CNG व्हर्जनमध्ये Grand i10 Nios ऑफर करते.

४. ह्युंदाई वेर्ना (Hyundai Verna) –

सेडानची बाजारपेठ कमी होत असताना, वेर्ना या काळात ग्राहकांसाठी आकर्षक पर्याय बनवण्यासाठी, ह्युंदाई या कारवर ५० हजार रुपयांच्या सवलती देत ​​आहे. ह्युंदाई Verna मध्ये 113bhp पेट्रोल इंजिन किंवा जास्त पॉवरफुल 158bhp पेट्रोल इंजिनसुद्धा असू शकते.