इलेक्ट्रिक व्हील सेक्टरमध्ये दुचाकींची सर्वाधिक संख्या उपलब्ध आहे ज्यामध्ये विविध फीचर्स, किंमत आणि रेंज उपलब्ध आहेत. कंपनीने अलीकडेच लॉंच केलेल्या या स्कूटरच्या रेंजमध्ये Okaya  फास्ट आहे. ओकाया फास्ट ही आकर्षक डिझाईन असलेली इलेक्ट्रिक स्कूटर आहे आणि एकाच चार्जवर मोठी रेंज देण्याचा दावा करत आहे. ज्यामध्ये त्याची किंमत, फीचर्स, रेंज, बॅटरी आणि स्पेसिफिकेशनसह संपूर्ण तपशील जाणून घेऊयात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

Okaya Faast F3 चे फीचर्स

Okaya Fast F3 या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये १२०० वॅटची मोटर कंपनीने दिली आहे. तसेच यामध्ये 3.53 kWh Li-ion LFP ड्युअल बॅटरी बसवण्यात आली आहे. जी स्वीचेबल टेक्नॉलॉजी अंतर्गत येते त्यामुळे बॅटरीचे लाईफ वाढते. या स्कूटरचा स्पीड हा प्रतितास ७० किमी इतका आहे. याची बॅटरी संपूर्णपणे चार्ज होण्यासाठी ४ ते ५ तासांचा वेळ लागतो. एकदा स्कूटर चार्ज झाली की वापरकर्ते १२५ किमी इतकी गाडी चालवू शकतात. कंपनीने याच्या बॅटरी आणि मोटरवर ३ वर्षांची वॉरंटी दिली आहे.

Okaya Faast F3 – (Image Credit- okayaev.com )

ओकाया फास्ट F3 मध्ये रिजनरेटिव्ह ब्रेकिंग, रिवॉर्ड मोड आणि पार्किंग मोड सारखे फीचर्स येतात. यामध्ये इको, सिटी आणि स्पोर्ट्स असे तीन रायडींग मोडस देण्यात आले आहेत. यामध्ये व्हील लॉकचे सेफ्टी फिचर देण्यात आले आहे ज्यामुळे तुमची गाडी चोरी होण्याची भीती दूर होते. म्हणजेच स्कूटरला कोणी चोरण्याचा , ढकलण्याचा प्रयत्न केल्यास याची चाके आपोआप लॉक होतात.

हेही वाचा : Odysse E-Scooter: ओडिसीची नवीन ई-स्कूटर वाहणार २५० किलोचे वजन, एकदा चार्ज झाली की धावणार ‘इतके’ अंतर, जाणून घ्या

ओकाया फास्ट F3 लॉन्च करताना ओकाया इलेक्ट्रिकचे व्यवस्थापकीय संचालक अंशुल गुप्ता म्हणाले , ओकाया फास्ट एफ ३ ही एक नाविन्यपूर्ण स्कूटर आहे. जी गुणवत्ता, विश्वसनीय इलेक्ट्रिक वाहनांची वाढती मागणी लक्षात घेऊन लॉन्च करण्यात आली आहे. याचे जबरदस्त फीचर्स आणि टेक्नॉलॉजी यामुळे ही एक आरामदायी आणि सुरक्षित स्कूटर आहे.

Okaya Faast F3 – (Image Credit- okayaev.com )

Okaya Faast F3 ची किंमत

ओकाया कंपनीने आपली Faast F3 इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च केली आहे. या स्कूटरची किंमत ही ९९,९९९ रुपये इतकी आहे. तुम्ही ही स्कूटर मेटॅलिक ब्लॅक , मेटॅलिक Cyan, मेटॅलिक ग्रे, मेटॅलिक सिल्व्हर, मेटॅलिक व्हाईट या रंगांमध्ये खरेदी करू शकणार आहात.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Okaya company launched okaya faast f3 electric scooter with attractive features tmb 01
Show comments