Okaya electric scooters : फ्लिपकार्टवर दैनंदिन गरजेच्या वस्तूसह आता वाहने देखील खरेदीसाठी उपलब्ध आहेत. फ्लिपकार्टने जुलै २०२२ पासून आपल्या संकेतस्थळावर ऑटो कॅटेगर देखील उपलब्ध केली आहे. येथून तुम्ही दुचाकी खरेदी करू शकता. दरम्यान, फ्लिपकार्टने आपल्या संकेतस्थळावरील ईव्ही वाहनांमध्ये आणखी पर्यायांचा समावेश केला आहे. फ्लिपकार्टवर फ्रिडम, क्लासिक आयक्यू + आणि फास्ट एफ २ बी या ओकाया कंपनीच्या दुचाक्या सादर करण्यात आल्या आहेत.
बाईक्स आणि कार खरेदी करण्यासाठी फ्लिपकार्टच्या संकेतस्थळावर ‘टू व्हीलर्स’ हा पर्याय देण्यात आला आहे. यामध्ये तुम्ही दुचाकी खरेदी करू शकता. खरेदी करण्यासाठी फ्लिपकार्टकडून नो कॉस्ट ईएमआय आणि कार्डसंबंधी ऑफर्स देण्यात आले आहेत. कंपनी १५ दिवसांत डिलिव्हरी करण्याची हमी देत आहे.
(200 किमी टॉप स्पीड, 300 किमी रेंज; पारंपरिक स्कुटर्सना मोठे आव्हान देऊ शकते ही ई स्कुटर)
पेपरलेस आणि परडवणाऱ्या खरेदीचे अनुभव देण्यासह १५ दिवसांत डिलिव्हरीची हमी, जे की या उद्योगामध्ये पहिल्यांदाच होत आहे, यासह दुचाकीचे विविध पर्याय देण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. ओकायाचे विविध मॉडेल ग्राहकांसाठी उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत, अशी प्रतिक्रिया फ्लिपकार्टच्या टू व्हीलर्स, ऑटोमोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक्सचे वरिष्ठ संचालक, राकेष कृष्णन यांनी दिली.
दुचाकी कॅटेगरी सुरू केल्यानंतर त्यास लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. कॅटेगरी लाँच केल्यापासून सर्चमध्ये १० पटीने वाढ झाल्याचा दावा फ्लिपकार्टने केला आहे.
(वाहनाच्या केबिनमध्ये ‘या’ वस्तू ठेवण्याचे टाळा, अन्यथा होऊ शकतो अपघात)
आम्ही देशातील सर्वात वेगाणे वाढणाऱ्या ईव्ही ब्रँड्सपैकी एक असून आम्ही हाय स्पीड आणि लो स्पीड ईव्ही ऑफर करतो, जे ग्राहकांची निवड सुधारण्यात मदत करते. ग्राहकांबाबत फ्लिपकार्टचे सखोल ज्ञान आणि त्यांच्या परडवणाऱ्या योजनांमुळे ग्राहकांमध्ये आमची पोहोच वाढेल, अशी आशा आहे, असा विश्वास ओकाया ईव्हीचे संचालक अनशूल गुप्ता यांनी व्यक्त केला.