Okaya Faast F2F E-Scooter Launched In India: देशातील आघाडीची इलेक्ट्रिक दुचाकी इलेक्ट्रिक वाहन उत्पादक कंपनीने आज २१ फेब्रुवारी २०२३ रोजी त्यांची नवीन इलेक्ट्रिक स्कूटर ‘Okaya Faast F2F’ देशांतर्गत बाजारात लाँच केली आहे. ही स्कूटर खास शहरी राइड आणि दैनंदिन वापरासाठी तयार करण्यात आली आहे, असा कंपनीचा दावा आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

Okaya Faast F2F कशी आहे खास

आकर्षक लुक आणि शक्तिशाली बॅटरी पॅकने सजलेल्या ओकायाच्या या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये, कंपनीने ८००W-BLDC-हब मोटर वापरली आहे जी 60V36Ah (२.२ kWh) लिथियम आयन- LFP बॅटरीसह जोडलेली आहे. कंपनीचा दावा आहे की, तिची बॅटरी उच्च सुरक्षा मानकांचे पालन करते आणि बॅटरीवर २ वर्षांची वॉरंटी दिली जात आहे. फास्ट F2F लाँच करून ओकायाचे उद्दिष्ट विद्यार्थी, तरुण व्यावसायिक इत्यादींना उद्देशून इलेक्ट्रिक स्कूटर्सची स्वस्त श्रेणी प्रदान करणे आहे.

(हे ही वाचा : 68 kmpl मायलेजवाली देशातली लोकप्रिय स्टायलिश स्कूटर फक्त १०,००० रुपयांमध्ये न्या घरी, बघा EMI किती? )

याशिवाय ओकाया फास्ट एफ2एफ टेलिस्कोपिक फ्रंट सस्पेन्शन आणि स्प्रिंग लोडेड हायड्रॉलिक रिअर शॉक अॅब्जॉर्बर सस्पेन्शन देण्यात आले आहे. या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये, कंपनीने रिमोट की, सर्व आवश्यक माहितीसह डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि स्टायलिश डीआरएल हेड-लॅम्प आणि एजी टेल-लॅम्प यांसारख्या वैशिष्ट्यांचा समावेश केला आहे. ही स्कूटी सहा रंगांमध्ये उपलब्ध असेल, ज्यामध्ये मेटॅलिक ब्लॅक, मेटॅलिक सायन, मॅट ग्रीन, मेटॅलिक ग्रे, मेटॅलिक सिल्व्हर आणि मेटॅलिक व्हाइट यांचा समावेश आहे.

Okaya Faast F2F फीचर्स

स्कूटरची बॅटरी लाँग लाइफ आणि उच्च तापमानातही उत्तम कामगिरी करते असा दावा कंपनीनं केला आहे. याशिवाय बॅटरीवर २ वर्षे/२०,००० किलोमीटरची वॉरंटीही दिली जात आहे.

कंपनीचे म्हणणे आहे की, नवीन Faast F2F इलेक्ट्रिक स्कूटर कमाल ५५ किमी प्रतितास वेगाने धावण्यास सक्षम आहे. एवढेच नाही तर यात १०-इंचाचे ट्यूबलेस टायर्स, टेलिस्कोपिक सस्पेंशन आणि स्प्रिंग लोडेड हायड्रॉलिक शॉक ऍब्जॉर्बर्स देखील मिळतात, जे खडबडीत आणि खराब रस्त्यावरही आरामदायी राइड देतात.

(हे ही वाचा : ना डिलिव्हरीचा पत्ता ना किंमत, तरीही Maruti च्या ‘या’ दोन कार खरेदी करण्यासाठी मार्केटमध्ये जमली गर्दी! )

कंपनीने या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये ऑन-द-गो जनरेशनसाठी ६०V क्षमतेची ३६Ah (२.२ kWh) Lithium Ion-LFP बॅटरी वापरली आहे. जे ८००W क्षमतेच्या इलेक्ट्रिक मोटरला जोडलेले आहे. बॅटरी पूर्णपणे चार्ज होण्यासाठी फक्त ४-५ तास लागतात आणि त्यात इको, सिटी आणि स्पोर्ट्स असे तीन ड्रायव्हिंग मोड आहेत.

Okaya Faast F2F किंमत

Okaya Faast F2F स्कूटर सहा रंग पर्यायांमध्ये ऑफर करण्यात आला आहे. यात मेटॅलिक ब्लॅक, मेटॅलिक सायन, मॅट ग्रीन, मेटॅलिक ग्रे, मेटॅलिक सिल्व्हर आणि मेटॅलिक व्हाइट या रंगाचा समावेश आहे. या इलेक्ट्रिक स्कूटरची सुरुवातीची किंमत ८३,९९९ रुपये (एक्स-शोरूम) ठेवण्यात आली आहे.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Okaya ev launched its faast f2f electric scooter in the indian market at a price of rs 84000 exshowroom pdb