ओला इलेक्ट्रिकने हिरो इलेक्ट्रिकला मागे टाकून देशातील नंबर १ इलेक्ट्रिक टू व्हिलर कंपनी बनली आहे. ओलाला भारतीय इलेक्ट्रिक टू-व्हीलर मार्केटमध्ये येऊन फक्त ५ महिने झाले आहेत. मात्र गेल्या महिन्यात ओला इलेक्ट्रिकने हिरो इलेक्ट्रिकला विक्रीच्या बाबतीत मागे टाकलं आहे.ओला इलेक्ट्रिकने हिरो इलेक्ट्रिकला मागे टाकून देशातील नंबर १ इलेक्ट्रिक टू व्हिलर कंपनी बनली आहे. ओलाला भारतीय इलेक्ट्रिक टू-व्हीलर मार्केटमध्ये येऊन फक्त ५ महिने झाले आहेत. मात्र गेल्या महिन्यात ओला इलेक्ट्रिकने हिरो इलेक्ट्रिकला विक्रीच्या बाबतीत मागे टाकलं आहे.
अलीकडेच, ओलाच्या स्कूटरला आग लागल्याच्या घटना घडली होती, याशिवाय अनेक युजर्सनी ड्रायव्हिंग रेंज, स्कूटरची कामगिरी यासह काही त्रुटी सोशल मीडियावर शेअर केल्या होत्या. मात्र असं चित्र असूनही ओलाने विक्रीत सर्वांना मागे टाकलं आहे. रस्ते वाहतूक मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, ओला इलेक्ट्रीक कंपनीने एप्रिलमध्ये सर्वाधिक इलेक्ट्रिक स्कूटर्सची विक्री केली. ओलाने एप्रिल महिन्यात १२६८३ युनिट्सची विक्री केली आहे. हिरो इलेक्ट्रिकची त्यांच्या विक्रीत ५० टक्के इतकी घसरण झाली असून केवळ ६५७० युनिट्सची विक्री करता आली. एप्रिलमध्ये ही कंपनी तिसऱ्या क्रमांकावर होती. दुसरे स्थान ओकिनावा ओटोटेक कंपनी पटकावले आहे. या कंपनीने तब्बल १०,००० इलेक्ट्रिक स्कूटर विकल्या आहेत.
आणखी वाचा : थ्री व्हीलर ईव्हीमध्ये ‘महिंद्रा इलेक्ट्रिक’चा दबदबा वाढला, भारतातील पहिल्या क्रमांकाची कंपनी ठरली
Ola Electric ने Ola S1 आणि Ola S1 Pro स्कूटरची किंमत ८५ हजार ते १.१० लाख रुपये ठेवली आहे. Ola S1 ची महाराष्ट्रात किंमत ९४,९९९ रुपये, राजस्थानमध्ये ८९,९६८ रुपये आणि गुजरातमध्ये ७९,९९९ रुपये आहे. Ola S1 Pro ची महाराष्ट्रात किंमत १,२४,९९९ रुपये, गुजरातमध्ये १,०९,९९९ रुपये आणि राजस्थानमध्ये १,१९,१३८ रुपये आहे.
ओला इलेक्ट्रिक स्कूटरला आग लागल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर ईव्ही कंपनीची प्रतिमा खालावली असताना ओला इलेक्ट्रिकने ही कामगिरी केली आहे, हे उल्लेखनीय आहे. विशेष म्हणजे, Hero Electric हा ब्रँड EV आगीच्या घटनेच्या वादापासून दूर राहिला आहे.