ओलाच्या इलेक्ट्रिक स्कुटर्स भारतात धुमाकूळ घालत आहेत. कमी खर्च आणि अधिक मायलेजमुळे लोक तिच्या स्कुटर्सना पसंती देत आहेत. नुकतेच ओलाने एस १ सिरीजमधील एस १ एअर ही नवी स्कुटर लाँच केली. ही तिची सर्वात स्वस्त स्कुटर असून ती इतर इलेक्ट्रिक वाहनांना तगडे आव्हान देत आहे. ओला इलेक्ट्रिक स्कुटर सेगमेंटमध्ये आघाडीवर आहेच, आता तिचा डोळा इलेक्ट्रिक कार क्षेत्रावर आहे. ओलाने नुकतेच तिच्या नव्या इलेक्ट्रिक कारचे टीझर रिलिज केले आहे. हा टिझर पाहून कार शौकिनांमध्ये या कारविषयी कमालीची उत्सुक्ता वाढली आहे.
ओलाने या अगोदरच आपल्या कारच्या बाहेरील भागाचे डिजिटल रेंडर्स प्रसिद्ध केले होते. त्यानंतर आता कंपनीने कारच्या आतील भागाचे काही दृष्य दाखवले आहेत. टिझरमध्ये कारला अनोखे फ्युचरिस्टिक स्टिअरिंग व्हिल मिळाल्याचे दिसून येत आहे. स्टिअरिंग व्हिलच्या कडा कॉर्नर चाम्फर्ड पद्धतीच्या आहेत. तसेच, स्टिअरिंग आडवे आयातकृती आकाराचे दिसते. एकंदरीत ते अष्टकोनी असल्याचे दिसते.
स्टिअरिंगला टू स्पोक डिजाईन जेट स्टाईल कंट्रोल्स देण्यात आले आहेत. स्टिअरिंगच्या मध्यभागी ओलाचे लोगो देण्यात आले आहे. रिअर व्ह्यू मिरर ऐवजी कॅमेरा देण्यात आले आहेत. मिरर ऐवजी कॅमेऱ्यांच्या वापराने कारचे एरोडायनामिक अधिक चांगले होण्याची शक्यता आहे. याने कारला होणारा हवेचा अडथळा कमी होऊन कारचा वेग वाढू शकते.
कारच्या पुढील भागात १२ इंचपेक्षा मोठा इन्फोटेन्मेंट सिस्टिम दिसून येत आहे. कारचे डॅशबोर्ड साधे आहे. कारच्या बाहेरील भागाबाबत बोलायचे झाल्यास तिला चंकी फ्रंट बंपर दिल्याचे दिसून येते. बंपरच्या कांठांवर पुढील ब्रेक्सना हवा देण्यासाठी मोठी जागा देण्यात आली आहे. कारला पुढे बोनेट लाइनला समांतर मोठी एलईडी स्ट्रिप देण्यात आली आहे. तर कारचे मागील भाग हे पुढील भागाप्रमाणेच दिसून येते. बंपरचे पृष्ठभाग स्मूथ आहे. मागे एलईडी स्ट्रिप टेल लाईट देण्यात आले आहेत.
(जीमेलचे ‘हे’ फीचर वापरा, अनावश्यक ईमेल्स आपोआप होतील डिलिट, स्टोअरेज स्पेसही वाचेल)
इतकी आहे रेंज
सिंगल चार्जमध्ये कार ५०० किमी पर्यंतची रेंज देण्याची शक्यता आहे. तसेच, कार ० ते १०० किमी पर्यंतचा वेग केवळ ४ सेकंदात गाठण्याची शक्यता आहे. कारच्या बॅटरीबाबत कुठलीही माहिती सध्या उपलब्ध नाही.