जगभरात इलेक्ट्रिक वाहनांचा ट्रेंड वाढत आहे. हे पाहता अनेक वाहन उत्पादक कंपन्या आपली इलेक्ट्रिक वाहने नवीन फीचर्ससह बाजारात आणत आहेत. यातच आता OLA इलेक्ट्रिकने दुचाकी इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये आणखी एक नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे. ओलाने डिसेंबर महिन्यात विक्रमी २५,००० इलेक्ट्रिक स्कूटर्सची विक्री केली आहे आणि यासह ती देशातील सर्वात जास्त विक्री होणारी इलेक्ट्रिक टू-व्हीलर ब्रँड बनली आहे. हा सलग दुसरा महिना आहे जेव्हा ओलाने २०,००० हजाराहून अधिक इलेक्ट्रिक वाहनांची विक्री केली आहे.

कंपनीच्या बाजार हिस्स्यात ३० टक्क्यांपर्यंत वाढ

ओला इलेक्ट्रिक, इलेक्ट्रिक टू-व्हीलर सेगमेंटमध्ये आपला वाटा झपाट्याने वाढवत आहे. एवढेच नाही तर या जबरदस्त कामगिरीमुळे कंपनीचा बाजार हिस्साही ३० टक्क्यांपर्यंत वाढला आहे. Ola व्यतिरिक्त, काही इतर ब्रँड्सनी देखील डिसेंबर महिन्यात भरपूर इलेक्ट्रिक स्कूटर विकल्या आहेत, ज्यामध्ये Ather Energy, TVS आणि Hero Electric हे प्रमुख आहेत. ओलाचे सीईओ, भावीश अग्रवाल, म्हणाले, “२०२२ हे वर्ष जागतिक इलेक्ट्रिक वाहन हब बनण्याच्या भारताच्या प्रवासासाठी योग्य वळण देणारे आहे.

bike thief shocking video viral
तुम्ही बाईक बिनधास्त कुठेही पार्क करताय? चोर अवघ्या सेकंदात अशी करतायत बाईकची चोरी; धक्कादायक VIDEO पाहाच
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
New 2025 Honda Dio Scooter Launched With Obd2b compliant And Advanced Features, See Price and details
Honda Dio Scooter: स्पोर्टी लूक, जास्तीचं मायलेज! नवीन ‘Dio’ स्कूटर लॉन्च, किंमत किती? जाणून घ्या डिटेल्स
Flipkart Monumental Sale
Flipkart Monumental Sale: एक लाखाच्या आत खरेदी करा TVS ‘ही’ बाईक; सिंगल चार्जवर धावेल ‘इतके’ किमी
Mercedes Benz India sales news in marathi
भारतात गाड्यांच्या विक्रीत दोन लाखांचा टप्पा; मर्सिडीज बेंझचा ‘आलिशान’ वरचष्मा कायम 
monkey
थेट एसटी बसच्या छतावर बसून माकडाचा ऐटीत प्रवास! Viral Video पाहून नेटकरी म्हणे, “तिकीट काढले का?”
ajith kumar team won dubai car race 2
सरावादरम्यान क्रॅश झाली होती कार, तरीही जिंकली दुबईतील स्पर्धा; ‘या’ दाक्षिणात्य सुपरस्टारवर कौतुकाचा होतोय वर्षाव
car is going viral on social media because of the quotes written on its front funny Photo goes viral
PHOTO: दोस्तांचा नादच नाय! मित्र पोलीस म्हणून कारवर लिहलं असं काही की पाहून तुम्हीही पोट धरुन हसाल

(हे ही वाचा : …म्हणून भारतीयांमध्ये ‘या’ कारची क्रेझ; झाली छप्परफाड विक्री, बनली नंबर १ )

OLA इलेक्ट्रिक स्कूटर किमती

OLA च्या इलेक्ट्रिक वाहन पोर्टफोलिओमध्ये S1 Air, S1 आणि S1 Pro यांचा समावेश आहे. कंपनीच्या बेस मॉडेल S1 Air ची सुरुवातीची किंमत ८४,९९९ रुपये, S1 मॉडेलची किंमत ९९,९९९ रुपये आणि S1 Pro ची किंमत १,३९,९९९ रुपये (एक्स-शोरूम) आहे. या तिन्ही स्कूटर अनुक्रमे १०१ किमी, १२८ किमी आणि १७० किमीच्या रेंजसह येतात.

इतर ब्रँडची विक्री किती?

हिरो इलेक्ट्रिकने २०२२ मध्ये १००,१२३ युनिट्सची आतापर्यंतची सर्वोत्तम वार्षिक विक्री नोंदवली.

Ather Energy ने डिसेंबर २०२२ मध्ये एकूण ९,१८७ इलेक्ट्रिक स्कूटर्सची विक्री केली आहे.

TVS ने डिसेंबर २०२२ मध्ये iQube च्या एकूण ११,०७१ युनिट्सची विक्री केली आहे.

ओलाने यावर्षी २०२२ मध्ये इलेक्ट्रिक स्कूटरच्या १.०८ लाख युनिट्सच्या विक्रीचा आकडा पार केला आहे.

Story img Loader