Ola Electric Sales: भारतातील सर्वात मोठी इलेक्ट्रिक दुचाकी उत्पादक कंपनी ओला इलेक्ट्रिकने एप्रिल २०२३ महिन्यातील विक्रीचे आकडे जाहीर केले आहेत. त्यानुसार ईव्ही स्कूटर मार्केटमध्ये कंपनीचा ४० टक्के हिस्सा आहे. ओला सलग आठव्या महिन्यात विक्रीच्या बाबतीत पहिल्या स्थानावर आहे. गेल्या महिन्यात कंपनीने ३०,००० हून अधिक वाहनांची विक्री केली आहे. Ola Electric ने Hero Electric, Ather, Okinawa इत्यादी इतर ई-स्कूटर उत्पादकांच्या विक्रीवर मात केली आहे आणि भारतातील सर्वात मोठ्या EV उत्पादकाचे बिरुद कायम ठेवले आहे. ओला भारतात S1 Air, S1 आणि S1 Pro सारख्या इलेक्ट्रिक स्कूटर विकते.
आउटलेट्स दुप्पट होतील
ऑनलाइन माध्यमातून आपल्या इलेक्ट्रिक स्कूटर्सची विक्री सुरू करणारी ओला इलेक्ट्रिक, आता देशभरात इलेक्ट्रिक वाहनांचा वेगवान अवलंब आणि विक्री वाढवण्याच्या उद्देशाने भारतभर अनेक ओला एक्सपिरियन्स सेंटर्स (ECs) स्थापन करून आपली ऑफलाइन उपस्थिती वाढवत आहे. वेगाने कंपनी लवकरच आपले ५००वे स्टोअर सुरू करणार आहे, जे या वर्षी ऑगस्टपर्यंत १,००० करण्याचे लक्ष्य आहे.
(हे ही वाचा : Tata, Mahindra, Hyundai समोर तगडं आव्हान, मारुती आणतेय देशातील सर्वात महागडी ७ सीटर MPV कार, किंमत… )
एस वन प्रो भरपूर विकला जातो
ओलाचे एस वन प्रो हे इलेक्ट्रिक स्कूटरचे सर्वात लोकप्रिय मॉडेल आहे. ज्यामध्ये ४ kWh चा लिथियम आयन बॅटरी पॅक उपलब्ध आहे. याची रेंज १८१ किमी प्रति चार्ज असल्याचा दावा केला जात आहे.