Ola Scooter Offers : भारतीय बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात ओलाच्या इलेक्ट्रिक स्कूटर्स विकल्या जात आहेत. आजकाल इलेक्ट्रिक गाड्यांची क्रेझ मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. पेट्रोलचे भाव वाढत असल्याच्या परिस्थितीत इलेक्ट्रिक गाडी अनेक लोकांकरता सोईस्कर ठरत आहे. या पार्श्वभूमीवर इलेक्ट्रिक स्कूटर खरेदीसाठी इच्छुकांकरिता आनंदाची बातमी आहे. ओला इलेक्ट्रिकने आपल्या ग्राहकांसाठी इलेक्ट्रिक स्कूटरवर एक खास धमाकेदार ऑफर जाहीर केली आहे. त्यानुसार ओला इलेक्ट्रिक स्कूटरच्या S1 लाइन-अपवर १५ हजार सूट दिली जात आहे. ओला इलेक्ट्रिक रश मोहिमेंतर्गत एक विशेष ऑफर जारी करण्यात आली आहे. त्यामध्ये डिस्काउंट, कॅश बॅक व एक्स्चेंज बोनस यांसारखे अनेक फायदे आहेत. ओलाची ही खास ऑफर २६ जून २०२४ पर्यंतच उपलब्ध आहे. त्यामुळे या ऑफरचा लवकरात लवकर लाभ घेऊन, खर्च होणारी मोठी रक्कम वाचविण्याची संधी ग्राहकांना मिळणार आहे.

काय आहे या ऑफरमध्ये?

तर, या ऑफरच्या अंतर्गत ऑफरसह Ola S1 X+ ची किंमत आता ८९,९९९ रुपयांपासून सुरू होते. S1 X+ ५,००० च्या फ्लॅट डिस्काउंटसह ती खरेदी केली जाऊ शकते. तसेच क्रेडिट कार्ड ईएमआयवर ५,००० रुपयांपर्यंतची कॅशबॅकही मिळत आहे.आणि पाच हजार रुपयांपर्यंतचा एक्स्चेंज बोनसदेखील मिळत आहे. जे क्रेडिट कार्ड वापरत नाहीत, ते S1 खरेदी करू शकतात. एकंदरीत इलेक्ट्रिक स्कूटर घेणे आता सामान्यांनाही परवडणार आहे

Ola Electric S1 Air आणि S1 Pro वर २,९९९ रुपयांचे मोफत Ola Care+ सबस्क्रिप्शन देत आहे. या सबस्क्रिप्शनमध्ये ग्राहकांना फ्री सर्व्हिस, वार्षिक कॉम्प्रिहेन्सिव डायग्नोसिस आणि सर्व्हिस पिक-अपचे पॅकेज दिले जात आहे. ओलाने आता आपली विक्री वाढविण्यासाठी ही खास ऑफर आणली आहे.

हेही वाचा >> कार किंवा बाईकच्या आरसी बुकवरचा पत्ता ऑनलाइन कसा बदलायचा? जाणून घ्या सोपी पद्धत; लगेच होईल काम

ओला इलेक्ट्रिकचे अतिरिक्त फायदे

ओलाच्या इलेक्ट्रिक स्कूटर्सवर कोणत्याही अतिरिक्त खर्चाशिवाय संपूर्ण S1 श्रेणीसाठी आठ वर्ष ८० हजार किमी विस्तारित बॅटरी वॉरंटी ऑफर दिली जात आहे. कंपनीने एक फास्ट चार्जर अॅक्सेसरीदेखील सादर केली आहे; जी २९ हजार ९९९ रुपयांमध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे.