देशभरात ओला कार/स्कूटरचा अलिकडे ट्रेंड आहे. कारण ओला कंपनीने ‘स्वस्त आणि मस्त’ म्हणून एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. म्हणूनच की काय, ग्राहक कंपनीचे अपग्रेट मॉडेल येण्याची वाटत पाहत असतात. अशातच, कंपनीने Ola इलेक्ट्रिक स्कूटर S1 Air लाँच करताच काही तासांतच ३ हजार लोकांनी बुकिंग केले आहे. सध्या देशात इलेक्ट्रिक स्कूटर विक्रीच्या बाबतीत Ola पहिल्या क्रमांकावर आहे. असं काय आहे ‘Ola S1 Air’ खास ? चला तर जाणून घेऊया.
‘Ola S1 Air’ काय आहे खास ?
स्कूटरमध्ये इको, नॉर्मल आणि स्पोर्ट्स असे तीन रायडिंग मोड देण्यात आले आहेत. यात कमी रिझोल्यूशनसह ७ -इंचाची टचस्क्रीन देखील मिळते. ही इलेक्ट्रिक स्कूटर सिंगल चार्जवर ९१ किमीची रेंज आणि ८.५ kW मोटरसह येते. स्कूटरची बॅटरी घरातील चार्जरने चार तासांत पूर्ण चार्ज होऊ शकते. कंपनीकडून S1 Air स्कूटर ११ कलर ऑप्शनमध्ये ऑफर करण्यात आली आहे. यामध्ये ओचर, लिक्विड सिल्व्हर, मॅट ब्लॅक, कोरल ग्लॅम, मिडनाईट ब्लू, जेट ब्लॅक, मार्शमॅलो, अँथ्रेसाइट ग्रे, मिलेनिअल पिंक, पोर्सिलेन व्हाइट आणि निओ मिंट कलरचा समावेश आहे.
‘Ola S1 Air’ स्कूटरची किंमत किती ?
इलेक्ट्रिक स्कूटर S1 Air ची सुरुवातीची किंमत १.०९ लाख रुपये असणार आहे. याचबरोबर, स्कूटरची मर्यादित खरेदी विंडो ३० जुलै दरम्यान उघडली जाणार आहे. त्यानंतर खरेदीदारांना स्कूटरसाठी १ लाख १९ हजार ९९९ रूपये भरावे लागतील, अशी माहिती कंपनीने दिली आहे.
‘या’ तारखेपासून होणार डिलिव्हरी
कंपनीचे सीईओ आणि संस्थापक भाविश अग्रवाल यांनी ट्विटद्वारे सांगितले की, बुकिंगच्या पहिल्या काही तासांतच ३ हजार लोकांनी बुकिंग केले आहे. या स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटरची डिलिव्हरी ऑगस्टच्या सुरुवातीपासून सुरू होईल.