इलेक्ट्रिक स्कुटरसाठी ओला ही देशात प्रसिद्ध आहे. आपल्या दोन इलेक्ट्रिक स्कुटर एस १ आणि एस १ प्रो च्या लाँचनंतर कंपनीने दिवाळीच्या पार्श्वभूमीवर एस १ सिरीजचा तिसरा आणि सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक स्कुटर एस १ एअर लाँच केला आहे. दरम्यान स्वस्त असला तरी ओला एस १ आणि एस २ च्या तुलनेत त्याची रेंज कमीच आहे. मात्र, बाजारातील अनेक पेट्रोल आणि इलेक्ट्रिक स्कुटर्सना तो आव्हान देणार आहे.
इतकी आहे किंमत
एस १ प्रोच्या किंमतीबाबत बोलायचे झाल्यास तो ८५ हजार रुपयांमध्ये उपलब्ध करण्यात आला आहे. मात्र दिवाळीपूर्वी बुकिंग करणाऱ्यांना हा स्कुटर ७९ हजार रुपयांना मिळणार आहे. म्हणजे स्कुटरवर ६ हजार रुपयांची बचत होणार आहे.
(पल्सर 250 की अपाचे २०० ४ व्ही, कोणती घ्यावी कळे ना? मग वाचा ही माहिती, निवडणे होइल सोपे)
बॅटरी आणि रेंज
Ola S1 Air मध्ये २.५ किलोवॉट हवरचे बॅटरी पॅक देण्यात आले आहे. ही बॅटरी ओला एस १ प्रोच्या तुलनेत छोटी आहे. बॅटरीला फुल चार्ज होण्यासाठी जवळपास ४.५ तासांचा वेळ लागतो. या स्कुटरमध्ये ४.५ किलोवॉटची मोटर देण्यात आली आहे. स्कुटर प्रति चार्ज इको मोडवर जवळपास १०० किमीची रेंज देत असल्याचा दावा कंपनीने केला आहे.
स्कुटरची परफॉर्मेन्स
ओला एस १ एयरची टॉप स्पीड ९० किमी प्रति तास आहे. स्कुटर ४.३ सेकंदात ० ते ४० किमी प्रति तासाचा वेग गाठते, असा कंपनीचा दावा आहे. स्कुटर हल्के असून त्याचे वजन ९९ किलो आहे. स्कुटरमध्ये टेलिस्कोपिक फ्रंट फोर्क आणि ट्विन रिअर शॉक अब्झॉर्बर देण्यात आले आहेत. तसेच स्कुटरमध्ये ड्रम ब्रेक देण्यात आले आहेत.
(मुलांसोबत करा सुरक्षित प्रवास, स्कोडाच्या ‘या’ आलिशान कार्सवर मिळत आहे मोठी सूट, जाणून घ्या ऑफर)
फीचर
एस १ प्रो प्रमाणे ओला एस १ एयरमध्ये देखील सात इंचचा टीएफटी डिस्प्ले देण्यात आला आहे. स्कुटरमध्ये रिव्हर्स बटन, हिल होल्ड फंक्शनालिटी, मल्टिपल प्रोफाइल सेटअप आणि प्रॉक्झिमिटी अलर्ट सारखे फीचर देण्यात आले आहेत. स्कुटरची कार्गो स्पेस कमी असून ती ३४ लिटर आहे.