गेल्या काही वर्षांत इलेक्ट्रिक वाहनांनी सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. भारतीय बाजारपेठेत इलेक्ट्रिक स्कूटर्सला मागणी वाढत आहे. यातच देशातील आघाडीची इलेक्ट्रिक दुचाकी निर्माता कंपनी ‘ओला’ इलेक्ट्रिकने ग्राहकांसाठी नवीन स्कूटर लाँच केली आहे. ओला इलेक्ट्रिकने नवीन एस१ एक्स 4kWh लाँच केली आहे, जी १९० किलोमीटरच्या रेंजचा दावा करते. तसेच याची किंमत १,०९,९९९ रुपये आहे आणि यांच्या डिलिव्हरीला एप्रिल २०२४ पासून सुरुवात होईल. तसेच कंपनीने ग्राहकांच्या चिंता लक्षात ठेवून आठ वर्षे किंवा ८०,००० किलोमीटरपर्यंतच्या सर्व उत्पादनांसाठी विस्तारित बॅटरी वॉरंटीदेखील जाहीर केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ओला एस १ एक्स रंग पर्याय :

नवीन ओला एस १ एक्सचा टॉप स्पीड ९० किलोमीटर प्रतितास आहे आणि ३.३ सेकंदात स्कूटर ० ते ४० किमी प्रतितास वेग वाढवू शकते. तसेच ओला एस १ एक्स रेड S1X रेड वेलोसिटी, मिडनाईट, व्होग, स्टेलर, फंक, पोर्सिलेन व्हाइट आणि लिक्विड सिल्व्हर या रंग पर्यायांमध्ये उपलब्ध आहे.

ओला एस १ एक्स व्हेरिएंट :

ओला एस १ एक्स तीन व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे, ज्यामध्ये ओला एस १ एक्स २/३ kWh बॅटरीसह बेस मॉडेल, ४ kWh बॅटरी आणि सर्वात शेवटी स्मार्ट कनेक्टिव्हिटीसह ३kWh बॅटरीसह ओला एस १ एक्स प्लस यांचा समावेश आहे. ओला एस १ एक्स २ kWh बॅटरी ही कंपनीची सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर आहे, ज्याची सुरुवातीची किंमत ७९,९९९ रुपये आहे; तर ३ केडब्ल्यूएच व्हेरिएंटची किंमत ८९,९९९ रुपये आहे, ज्याची रेंज १४३ किलोमीटरपर्यंत आहे. त्याचप्रमाणे ३kWh बॅटरी पॅक आणि स्मार्ट कनेक्टिव्हिटी या फीचर्ससह ओला एस १ एक्स प्लसची (Ola S1 Ex +) रेंज १५३ किलोमीटर असून याची किंमत ९९,९९९ रुपये आहे. तसेच तिसरे व्हेरिएंट ४kWh बॅटरी आणि १९० किलोमीटरच्या रेंजसह ओला एस १ एक्सची किंमत १,०९,९९९ आहे; जे सगळ्यात महागडे मॉडेल आहे. लक्षात घ्या की, या किमतींमध्ये FAME-II सबसिडीचा समावेश आहे.

हेही वाचा…Budget 2024 : इलेक्ट्रिक वाहनांना अच्छे दिन; उत्पादन अन् चार्जिंग स्टेशनमध्ये होणार वाढ

नवीन एस १ एक्स लाँच करणे, आठ वर्षांची वॉरंटी जाहीर करण्याबरोबर ओला Ola ने १,२५,००० किलोमीटरपर्यंतचे अतिरिक्त वॉरंटी पॅकेजेसदेखील सादर करते आहे. त्याच इव्हेंटमध्ये, इव्ही स्टार्टअपने या तिमाहीच्या अखेरीस सध्याच्या १००० युनिट्सवरून १०,००० युनिट्सपर्यंत चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चरचा विस्तार करण्याची आपली योजना जाहीर केली, ज्यामध्ये निवासी क्षेत्रे आणि महामार्ग समाविष्ट आहेत. दरम्यान, कंपनीने एप्रिलपर्यंत आपले सेवा नेटवर्क ६०० केंद्रांपर्यंत विस्तारण्याची योजना जाहीर केली आहे.