Ola Roadster Launch: देशातील आघाडीची इलेक्ट्रिक टू-व्हीलर उत्पादक कंपनी ओला इलेक्ट्रिकने दीर्घ प्रतीक्षेनंतर अखेर अधिकृतपणे आपली पहिली इलेक्ट्रिक मोटरसायकल रेंज ओला रोडस्टर स्थानिक बाजारात लाँच केली आहे. रोडस्टर एक्स, रोडस्टर व रोडस्टर प्रो अशा एकूण तीन व्हेरियंट्समध्ये ही बाईक सादर करण्यात आली आहे. हे सर्व प्रकार वेगवेगळ्या बॅटरी पॅकसह येतात. या बाइक रेंजची म्हणजेच बेस मॉडेलची Ola Roadster X सुरुवातीची किंमत फक्त ७४,९९९ रुपये (एक्स-शोरूम) निश्चित करण्यात आली आहे.

Ola Roadster मालिकेची किंमत

Roadster Xच्या एंट्री लेव्हल व्हेरिएंटबद्दल सांगायचे झाल्यास हे मॉडेल 2.5kWh, 3.5kWh व 4.5kWh अशा तीन बॅटरी पॅकमध्ये येते. त्याची किंमत अनुक्रमे ७४,९९९ रुपये, ८४,९९९ रुपये व ९९,९९९ रुपये (एक्स-शोरूम, बेंगळुरू), अशी आहे.

मिड व्हेरिएंट म्हणजे रोडस्टरलादेखील 3 kWh, 4.5kWh व 6kWh अशा तीन वेगवेगळ्या बॅटरी पॅकसह सादर केले गेले आहे. त्याची किंमत अनुक्रमे १,०४,९९९ रु., १,१९,९९९ रु. व १,३९,९९९ रु. (एक्स-शोरूम, बेंगळुरू), अशी आहे.

हेही वाचा… अखेर प्रतिक्षा संपली! तरुणांची आवडती बाईक ‘या’ दिवशी होणार लाँच; फीचर्स अन् डिझाईन पाहून प्रेमात पडाल

त्याशिवाय कंपनीने फक्त 8kWh व 16kWh च्या दोन बॅटरी पॅकसह रोडस्टर प्रो हा उच्च प्रकार सादर केला आहे.

त्याशिवाय कंपनीने उच्च व्हेरियंट म्हणजेच Roadster Pro हा फक्त 8kWh व 16kWh च्या दोन बॅटरी पॅकसह सादर केला आहे. त्याची किंमत अनुक्रमे १,१९,९९९ रुपये व २,४९,९९९ रुपये (एक्स-शोरूम, बेंगळुरू), अशी आहे.

पॉवर, परफॉर्मन्स व रेंज

बॅटरीची क्षमता व किमतींव्यतिरिक्त रोडस्टर एक्स आणि रोडस्टर या सुरुवातीच्या दोन व्हेरियंटचे स्वरूप व डिझाईन मोठ्या प्रमाणात समान आहे. Roadster X चे टॉप मॉडेल म्हणजेच 4.5kWh चा व्हेरियंट सिंगल चार्जमध्ये २०० किमीची रेंज देतो. या व्हेरियंटची टॉप स्पीड १२४ किमी/तास आहे.

तर दुसऱ्या मॉडेल Roadster चा टॉप 6kWh व्हेरियंट सिंगल चार्जमध्ये २४८ किमीची ड्रायव्हिंग रेंज देतो. या व्हेरियंटचा टॉप स्पीड १२६ किमी/तास आहे. Roadster x मध्ये 11kWची इलेक्ट्रिक मोटर आहे; तर रोडस्टरमध्ये 13kW ची इलेक्ट्रिक मोटर आहे.

Roadster Pro बद्दल बोलायचे, तर त्याची किंमत सर्वांत जास्त आहे. 16kWh बॅटरी पॅकसह त्याच्या टॉप मॉडेलबद्दल कंपनीचा दावा आहे की, ही बाईक एका चार्जमध्ये ५७९ किमीपर्यंत ड्रायव्हिंग रेंज देण्यास सक्षम आहे. या बाईकमध्ये 52kW ची इलेक्ट्रिक मोटर आहे, जी 105Nm टॉर्क जनरेट करते. त्याचा अत्युच्च वेग १९४ किमी/तास आहे, जी सामान्यतः कोणत्याही पेट्रोल असणाऱ्या बाईकपेक्षा खूप चांगली असते. हा व्हेरियंट केवळ १.६सेकंदात शून्य ते ६० किमी/ताशी वेग वाढविण्यास सक्षम आहे.

फीचर्स (Features)

Roadster X मध्ये कंपनीने स्पोर्ट्स, नॉर्मल व इकोसह तीन रायडिंग मोड दिले आहेत. त्यात 4.3 इंचांचा LCD डिस्प्लेदेखील आहे, जो MoveOS वर चालतो. ओला मॅप्स नेव्हिगेशन (टर्न-बाय-टर्न), क्रूझ कंट्रोल, डीआयवाय मोड, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टीम, ओटीए अपडेट, डिजिटल की यांसारखी वैशिष्ट्ये यामध्ये देण्यात आली आहेत. ओला इलेक्ट्रिकच्या स्मार्टफोन ॲपवरूनही तुम्ही ही बाईक ऑपरेट करू शकता.

Roadsterने दुसऱ्या व्हेरियंटमध्ये आणखी काही वैशिष्ट्ये समाविष्ट केली आहेत. त्यात हायपर, स्पोर्ट, नॉर्मल व इको असे चार ड्रायव्हिंग मोडस् आहेत. त्यात मोठी ६.८ इंचांची टीएफटी टचस्क्रीन डिस्प्ले सिस्टीम आहे. आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI) आधारित वैशिष्ट्ये जशी की, प्रॉक्सिमिटी अनलॉक, क्रूझ कंट्रोल, पार्टी मोड, छेडछाड अलर्ट, कृत्रिम साह्यदेखील दिले गेले आहेत.

हेही वाचा… पावसाळ्यात कारच्या काचेवर धुके साचते आहे का? ‘या’ उपायामुळे एका मिनिटात दूर होईल ओलावा

Roadster Proच्या फीचर्सबद्दल सांगायचे झाल्यास स्टील फ्रेमवर आधारित या बाईकमध्ये पुढील बाजूस अप-साइड-डाउन (USD) फोर्क आणि मागील बाजूस मोनोशॉक सस्पेंशन आहे. यात 10 इंच TFT टचस्क्रीन डिस्प्ले आहे.कंपनीने या बाइकमध्ये चार रायडिंग मोड (हायपर, स्पोर्ट, नॉर्म व इको)देखील समाविष्ट केले आहेत. त्याशिवाय यामध्ये दोन सानुकूल करण्यायोग्य (customizable) मोडदेखील उपलब्ध आहेत. जे ग्राहक त्यांच्या गरजेनुसार वापरू शकतात.

बुकिंग आणि डिलिव्हरी

ओला इलेक्ट्रिकचे संस्थापक व सीईओ भाविश अग्रवाल यांचे म्हणणे आहे की, या सर्व बाईकचे बुकिंग अधिकृतपणे सुरू झाले आहे. ही बाईकृ कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवरून बुक केली जाऊ शकते. त्याशिवाय कंपनी Roadster X आणि Roadsterची डिलिव्हरी पुढील वर्षी जानेवारीपासून सुरू करण्याचा विचार करीत आहे. तर दुसरीकडे Roadster Proची बुकिंग २०२६ ला सुरू होईल.