Ola S1 Air to be available at Rs 1.1 lakh till August 15: ओला इलेक्ट्रिक सध्या देशातील नंबर वन इलेक्ट्रिक दुचाकी कंपनी आहे. कंपनीने अलीकडेच सर्व नवीन S1 एअर इलेक्ट्रिक स्कूटरची विक्री सुरू केली आहे. ही ओलाची सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर आहे, जी प्रत्यक्षात S1 Pro ची स्वस्त आवृत्ती आहे. कंपनीने सुरुवातीच्या काही ग्राहकांसाठी या स्कूटरची किंमत १.०९ लाख रुपये निश्चित केली होती, जी नंतर १०,००० रुपयांनी वाढवण्यात आली. मात्र, कंपनीने ग्राहकांना भेट देत ही किंमत १५ ऑगस्टपर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ओला इलेक्ट्रिकचे सीईओ भाविश अग्रवाल यांनी एका ट्विटमध्ये घोषणा केली आहे की, कंपनीने मोठ्या मागणीमुळे सर्व ग्राहकांसाठी S1 एअर इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत १५ ऑगस्टपर्यंत १.०९ लाख रुपयेच ठेवली आहे. या घोषणेमुळे, कंपनीला आता S1 एअरसाठी अधिक बुकिंग मिळण्याची अपेक्षा आहे.

(हे ही वाचा : ‘या’ मेड इन इंडिया स्वस्त बाईकसाठी ग्राहकांच्या रांगा, तुफान मागणी पाहून कंपनी ‘या’ दिवशी करणार बुकिंग बंद )

ओला एस1 एअर इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये ३ kWh चा बॅटरी पॅक देण्यात आले आहे. ही स्कूटर १२५ किमी गतीने धावण्याचा दावा करण्यात आला आहे. याची उच्चांकी गती ९० किमी/तास अशी आहे. यामध्ये एक हब मोटर आहे. त्याला ओला हायपरड्राइव मोटर असे म्हणतात. हे इलेक्ट्रिक स्कूटर ११.३ HP ची पॉवर आणि ५८ NM चा पीक टॉर्क देण्यास ही स्कूटर सक्षम आहे. कंपनीकडून S1 Air स्कूटर ११ कलर ऑप्शनमध्ये ऑफर करण्यात आली आहे.