इलेक्ट्रिक स्कुटरला प्राधान्य देणारे ग्राहक ओलाच्या नव्या इलेक्ट्रिक स्कुटरच्या लाँचची वाट बघत होते. त्यांची ही प्रतीक्षा मागच्या वर्षी संपली आणि आता या स्कुटरची डिलिव्हरी सुरू झाली आहे. ओलाने S1 इलेक्ट्रिक स्कुटरची डिलीटव्हरी ७ सप्टेंबर पासून सुरू होणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार ओलाच्या या नव्या इलेक्ट्रिक स्कुटरची डिलिव्हरी सुरू झाली आहे.
ओला S1 इलेक्ट्रिक स्कुटरची किंमत ९०,००० रुपयांपासुन (एक्सशोरूम किंमत) सुरू होते. ही किंमत थोड्या कालावधीसाठी असणार आहे. नंतर या स्कुटरची किंमत बदलली जाऊ शकते. ही स्कुटर मागच्या वर्षी लाँच करण्यात आली होती. ही स्कुटर ओलाचे दुसरे इलेक्ट्रिक वाहन आहे. याआधी लाँच करण्यात आलेल्या S1 प्रोचे हे लहान मॉडेल आहे.
आणखी वाचा : अखेर प्रतीक्षा संपली! XUV 400 चा टिझर शेअर करत आनंद महिंद्रा यांनी जाहीर केली लाँचची तारीख
फीचर्स
यामध्ये S1 3 kWh बॅटरी पॅकसह उपलब्ध आहे. यात तीन रायडिंग मोड आहेत. ज्यामध्ये इको, नॉर्मल आणि स्पोर्ट्स मोडचा समावेश आहे. इकोमध्ये रायडिंग रेंज १२८ किमी आहे, नॉर्मलमध्ये रायडिंग रेंज १०१ किमीपर्यंत आहे आणि स्पोर्ट मोडमध्ये रायडिंग रेंज ९० किमी आहे. ओला S1 चा टॉप स्पीड ९५ kmph आहे.
पाच रंगांमध्ये आहे उपलब्ध
कॉस्मेटिकदृष्ट्या, S1 आणि S1 Pro दोन्ही इलेक्ट्रिक स्कूटर सारख्या दिसतात. दोघांमध्ये बॅजिंग आणि काही फीचर्सचा फरक आढळून येतो. S1 पाच रंगांच्या पर्यायामध्ये विकला जातो. यामध्ये निओ मिंट, जेट ब्लॅक, पोर्सिलेन व्हाइट, लिक्विड सिल्व्हर आणि कोरल ग्लॅम यांचा समावेश आहे. S1 मध्ये क्रूझ कंट्रोल आणि हायपर मोडचा अभाव आहे. हे अजूनही Move OS 2 वर चालते आणि यामध्ये ७ इंच टचस्क्रीन फीचर्स उपलब्ध आहे, ज्याद्वारे तुम्ही स्कूटर नियंत्रित करू शकता.