देशात महागाई वाढत चालल्याने सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहेत. इंधनाच्या किमती अधिक वाढल्याने अनेकांचा इलेक्ट्रिक वाहने खरेदी करण्याचा कल वाढला आहे. तसेच दिवसेंदिवस अनेक कंपन्यांची इलेक्ट्रिक वाहने बाजारात सादर होत आहेत. परंतु इलेक्ट्रिक वाहन महाग असल्यामुळे ते घेणे सर्वसामान्यांना परवडत नाही. पण आता तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. जर तुम्हीही इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आता तुमच्या पैशांची देखील बचत होणार आहे. कारण, आता ओलाच्या लोकप्रिय इलेक्ट्रिक स्कूटरच्या किमतीत ५,००० रुपयांनी कपात करण्यात आली आहे.
ओलाच्या ‘या’ इलेक्ट्रिक स्कूटरच्या किमतीत कपात
ओला इलेक्ट्रिकचे सीईओ भाविश अग्रवाल यांनी ट्विट केले की, Ola S1 Pro स्कूटरच्या किमतीत कपात करण्यात आली आहे. ही स्कूटर आता १,२४,९९९ रुपयांना उपलब्ध होईल. यापूर्वी या स्कूटरची किंमत १,२९,९९९ रुपये होती आणि आता ते १,२४,९९९ रुपये आहे. त्यामुळे आता या किमतीतील कपातीमुळे अनेकांना स्कूटर खरेदी करता येणार आहेत. पण लोकप्रियता असूनही ओला इलेक्ट्रिकने या ई-स्कूटरची किंमत का कमी केली? यामागे मुळात दोन कारणे आहेत. चला जाणून घेऊया या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये कपात का करण्यात आली.
(हे ही वाचा : Maruti, Mahindra चा गेम होणार, टाटा मोटर्स आणतेय चार SUV कार, सीएनजी मॉडेलचाही असेल समावेश )
Ola S1 Pro E-Scooter ची लोकप्रियता असूनही किंमत का कमी करण्यात आली?
इलेक्ट्रिक वाहन न्यूज वेबसाइट e-vehicleinfo च्या रिपोर्टनुसार, Ola S1 Pro च्या किमतीत घट होण्याची दोन कारणे समोर येत आहेत. ओला इलेक्ट्रिकला किंमत कमी करण्यावर लक्ष केंद्रित करायचे आहे जेणेकरून ते मोठ्या संख्येने ग्राहकांपर्यंत पोहोचू शकेल. दुसरे म्हणजे, Ola S1 Air लाँच झाल्यानंतर, Ola S1 आणि Ola S1 Pro या दोन स्कूटरच्या विक्रीत किंचित घट झाली. आता ही किंमत कपात लोकांना आठवण करून देण्यासाठी आहे की इलेक्ट्रिक स्कूटर अजूनही बाजारात उपलब्ध आहेत. तसेच, Ola S1 Pro ची किंमत आता Ola S1 Air च्या जवळपास आहे.
सवलत ऑफर
ओला इलेक्ट्रिककडून मिळालेल्या माहितीनुसार, या इलेक्ट्रिक स्कूटर्सच्या खरेदीवर ४,००० रुपयांपर्यंतची बचत होऊ शकते. कंपनी Ola S1 वर २,००० रुपयापर्यंत आणि S1 Pro वर ४,००० रुपयापर्यंत सूट देत आहे. याशिवाय, कंपनी सबस्क्रिप्शन आणि विस्तारित वॉरंटी पॅकेजवर इतर फायदे देखील देत आहे. Ola आपल्या समुदाय सदस्यांना Ola Care+ सदस्यता आणि सर्व अनुभव केंद्रांवर विस्तारित वॉरंटीवर ५० टक्के सूट देखील देत आहे.