OLA इलेक्ट्रिक लवकरच त्याच्या S1 आणि S1 Pro इलेक्ट्रिक स्कूटरसाठी अपडेट जारी करणार आहे ज्यामध्ये ग्राहकांना नेव्हिगेशन आणि क्रूझ कंट्रोल सारखी फिचर्स मिळतील. ओला इलेक्ट्रिकने या दोन्ही इलेक्ट्रिक स्कूटर ऑगस्ट २०२१ मध्ये लॉन्च केल्या होत्या. ज्याची डिलिव्हरी ओला इलेक्ट्रिकने जानेवारी २०२२ मध्ये सुरू केली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तुमची इलेक्ट्रिक स्कूटर कशी अपडेट करावी
ओला इलेक्ट्रिक S1 आणि S1 प्रो इलेक्ट्रिक स्कूटरसाठी ओव्हर द एअर (OTA) द्वारे अपडेट दिलं आहे. ज्यामध्ये तुमची इलेक्ट्रिक स्कूटर आपोआप अपडेट होईल. ओला इलेक्ट्रिकच्या अपडेटमध्ये नेव्हिगेशन, क्रूझ कंट्रोल आणि ब्लूटूथ यांसारखी अनेक फिचर्स उपलब्ध असतील.

OLA Elecric ची दुसरी विंडो लवकरच उघडेल
ज्या ग्राहकांनी Ola इलेक्ट्रिक स्कूटर बुक केली आहे त्यांच्यासाठी कंपनी १७ मार्च रोजी पेमेंटची दुसरी विंडो उघडणार आहे. या विंडोद्वारे, ज्या लोकांनी S1 आणि S1 Pro इलेक्ट्रिक स्कूटर बुक केले आहेत ते त्यांचे अंतिम पेमेंट करू शकतात.

आणखी वाचा : जिओ फेन्सिंग सारख्या फिचर्ससह ओबेन रॉर इलेक्ट्रिक बाइक लाँच, या ऑफर 3 वर्षांच्या वॉरंटीसह ऑफर

EMI वर OLA स्कूटर्स खरेदी करण्याचा पर्याय
जे OLA इलेक्ट्रिक स्कूटरसाठी एकाच वेळी पैसे देऊ शकत नाहीत ते Ola इलेक्ट्रिक स्कूटर २,९९९ च्या EMI वर खरेदी करू शकतात. ओला इलेक्ट्रिकने फायनान्स करण्यासाठी HDFC, ICICI, Axis आणि बँक ऑफ बडोदा यासह इतर अनेक बँकांशी करार केला आहे.

Ola S1 आणि S1 Pro चा स्पीड
Ola S1 ची रेंज १२१ किमी आणि टॉप स्पीड ९० किमी प्रतितास आहे. दुसरीकडे, Ola S1 Pro ची रेंज 181 किमी आणि टॉप स्पीड 115 किमी प्रतितास आहे असे म्हटले जाते. ब्लॅक, पिंक, यलो, ब्लू, व्हाईट अशा एकूण 10 कलर ऑप्शनमध्ये स्कूटर खरेदी करता येईल.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ola s1 pro electric scooter soon get navigation and cruise control features know how to update prp