Best Selling Electric Scooter: भारतात इलेक्ट्रिक वाहनांची लोकप्रियता वाढत आहे आणि त्याचबरोबरच इलेक्ट्रिक स्कूटर्सची विक्रीही झपाट्याने वाढत आहे. वाहन कंपन्या दररोज नवनवीन इलेक्ट्रिक स्कूटर्स बाजारात आणत आहेत. भारतात इलेक्ट्रिक टू व्हीलर मार्केट खूप वेगाने वाढत आहे. जून महिन्यातही इलेक्ट्रिक स्कूटरची प्रचंड विक्री झाली आहे. एका इलेक्ट्रिक स्कूटरचा भारतीय बाजारपेठेत बोलबाला पाहायला मिळाला, जबरदस्त रेंज, फीचर्स, लूक डिझाईन यामुळे या इलेक्ट्रिक स्कूटर्सची विक्री दणक्यात झाली. चला तर जाणून घेऊया कोणत्या इलेक्ट्रिक स्कूटर्सला भारतीय बाजारपेठेत सर्वाधिक पसंती मिळाली.
TVS iQube ही देशातील तिसरी सर्वाधिक विक्री होणारी स्कूटर ठरली आहे. या वर्षी जूनमध्ये, iQube इलेक्ट्रिक स्कूटरच्या १५,२१० दुचाकींची विक्री झाली होती, तर गेल्या वर्षी जूनमध्ये कंपनीने एकूण १४,४६२ गाड्यांची विक्री केली होती. अलीकडेच, TVS ने iQube ‘TVS iQube (2.2 kWh) चा स्वस्त प्रकार बाजारात लॉन्च केला होता, ज्याची एक्स-शोरूम किंमत ९४,९९९ रुपये ठेवण्यात आली आहे. या स्कूटरमध्ये २.२ kWh क्षमतेचा बॅटरी पॅक आहे. ही स्कूटर २ तासात ८० टक्क्यांपर्यंत चार्ज होते. त्याची ड्रायव्हिंग रेंज ७५ किलोमीटर आहे. या स्कूटरमध्ये ३२ लीटर अंडर सीट स्टोरेज आहे जिथे तुम्ही दोन हेल्मेट एकत्र ठेवू शकता. यात १७.७८ सेमीचा टच स्क्रीन डिस्प्ले आहे.
(हे ही वाचा : बाजारपेठेत उडाली खळबळ! ‘या’ तुफान मागणी असणाऱ्या कारला टाटा आणतेय दोन CNG सिलिंडरसह, आता मायलेज वाढणार! )
बजाज चेतक इलेक्ट्रिक स्कूटर दुसऱ्या स्थानावर आहे. गेल्या महिन्यात कंपनीने एकूण १३,६२० दुचाकींची विक्री केली होती तर गेल्या वर्षी कंपनीने ७,०८० दुचाकींची विक्री केली. चेतकचे क्लासिक त्याच्या डिझाइनमुळे खूप चर्चेत आहे. यात डिजिटल कन्सोल आहे. याशिवाय स्कूटरमध्ये एलईडी लाइट्स आणि डिझायनर टेललाइट्स देण्यात आले आहेत. यात इको आणि स्पोर्ट्स असे दोन रायडिंग मोड असतील. बजाज चेतक इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत सध्या १.२३ लाख ते १.४७ लाख रुपयांपर्यंत आहे.
‘या’ इलेक्ट्रिक स्कूटरने मारली बाजी
जून महिन्यात, ओलाने आपल्या इलेक्ट्रिक स्कूटर S1 च्या ३६,७२३ गाड्यांची विक्री केली, तर गेल्या वर्षी कंपनीने १७,५७९ दुचाकींची विक्री केली. जून महिन्यात या स्कूटरने पुन्हा एकदा पहिल्या क्रमांकावर आपले स्थान निर्माण करण्यात यश मिळवले आहे. काही काळापूर्वी ओलाने परवडणारी S1 सादर केली होती ही कंपनीची हायस्पीड स्कूटर आहे, ज्यात अलॉय व्हील आणि ट्यूबलेस टायर आहेत. स्कूटर साध्या हँडलबार आणि एलईडी लाईटसह येते.