TVS Sports Bikes: ग्राहकांना चांगले मायलेज देणारी बाईक हवी आहे. अशा स्थितीत जर आपणही नवीन बाईक घेण्याचा विचार करत असाल, तर आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत देशातील सर्वाधिक मायलेज देणारी बाईक. ज्या बाईकसंदर्भात आम्ही बोलणार आहोत ती बाईक केवळ मायलेजसाठीच प्रसिद्ध नाही, तर ती उच्च मायलेजसह आकर्षक स्पोर्टी लुकही देते. ही बाईक TVS Sport आहे, जी वर्षानुवर्षे ग्राहकांच्या मनावर राज्य करत आहे. पॉवरफुल इंजिनसोबतच यात अनेक आधुनिक फिचर्सही आहेत.
TVS Sports बाईकची किंमत
TVS स्पोर्ट बाईकची भारतात किंमत ६३,९५० पासून सुरू होते आणि टॉप-एंड प्रकारासाठी ६७,४४३ पर्यंत जाते. तथापि, अनेक ऑनलाइन वेबसाइटवर त्याच्या जुन्या मॉडेलची किंमत खूपच कमी आहे. TVS स्पोर्ट बाइक्सच्या जुन्या मॉडेल्सच्या खरेदी आणि विक्रीसाठी अनेक वेबसाइट्स उपलब्ध आहेत. या रिपोर्टमध्ये तुम्ही या डील्सबद्दल जाणून घेऊ शकता, जिथे तुम्हाला ही बाईक २५ हजारांमध्ये खरेदी करण्याची संधी मिळेल. ड्रूम या ऑनलाइन वेबसाइटवर या बाईक्स खरेदीसाठी उपब्ध आहेत.
TVS स्पोर्ट 100cc 2013
या बाईकसाठी २७,५०० रुपये मागितले आहेत. या २०१३ मॉडेल TVS Sport ने २८,५०३ किमी अंतर कापले आहे. या काळ्या रंगाच्या बाईकचा नोंदणी क्रमांक DL 4S आहे.
(हे ही वाचा : देशातील ‘या’ सर्वात स्वस्त १६० सीसी बाईकसमोर सर्व पडतात फिक्या? १ लिटर पेट्रोलमध्ये धावते ५५ किमी )
TVS स्पोर्ट 100cc 2018
या बाईकसाठी ३५,५०० रुपये मागितले आहेत. २०१८ मॉडेलसह या TVS स्पोर्ट्स बाईकने १७,००० किमी अंतर कापले आहे . या लाल रंगाच्या बाईकचा नोंदणी क्रमांक DL 8S आहे.
TVS स्पोर्ट 100cc 2013
TVS स्पोर्ट माॅडेल २०१३ चा आहे आणि आतापर्यंत २५,००० किमी अंतर पार केले आहे. या दुचाकीसाठी २५,५०० रुपयांची मागणी करण्यात आली आहे. बाईकचा रंग काळा आहे आणि तिचा नोंदणी क्रमांक DL 7S आहे.
TVS स्पोर्ट 100cc 2011
हा TVS स्पोर्ट २०११ चा आहे आणि आतापर्यंत ४२,८७९ किमी अंतर कापले आहे. या बाईकची किंमत २९,००० रुपये वाढवण्यात आली आहे. बाईकचा रंग काळा असून त्याचा नोंदणी क्रमांक DL 4S आहे.