Rishabh Pant Accident: टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर ऋषभ पंतच्या (Rishabh Pant) कारचा (३० डिसेंबर) पहाटे दिल्लीहून उत्तराखंडला जात असताना अपघात (Car Accident) झाला. ज्यामध्ये तो गंभीर जखमी झाला. सध्या ऋषभ पंतवर उपचार सुरू असून त्याची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचं समजतं आहे. हा अपघात इतका भीषण होता की, पंत ज्या कारमध्ये होते ती गाडी काही मिनिटांतच जळून खाक झाली आणि बऱ्याच प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात आली.
ऋषभ पंतच्या अपघाताचे कारण काय?
ऋषभ पंतसोबत झालेल्या अपघाताबाबत अनेक बातम्या आल्या आहेत, ज्यात काही दाट धुक्याबद्दल तर काही पंत झोपल्याबद्दल बोलतात. मात्र, या अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर समोर आलेल्या अहवालानुसार, ओव्हर स्पीड (अतिवेग) हे देखील या अपघाताचं कारण असू शकतं असं म्हटलं जात आहे.
(हे ही वाचा : Rishabh Pant Car Collection: ऋषभ पंतच्या ताफ्यात ‘या’ महागड्या कारचा समावेश; पाहा गाड्यांची किंमत आणि खासियत…)
Rishabh Pant Accident CCTV Footage
सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसतं की, ऋषभ पंतची कार रेलिंगला आदळल्यानंतर वेगाने आणि उलटताना दिसत आहे. सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यानंतर पंत जास्त वेगाने कार चालवत असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. ज्या ठिकाणी अपघात झाला, तो मार्ग अरुंद असून त्यात वाहनाचे नियंत्रण सुटले आणि अपघात झाला. मात्र, अपघाताचे अधिकृत कारण अद्याप समोर आलेले नाही.
Over Speed साठी कापण्यात आले आतापर्यंत दोन चालान
ऋषभ पंत हा अतिवेगाने गाडी चालवण्यासाठी ओळखला जातो आणि या चुकीमुळे आतापर्यंत त्याला दोन चालान कापलं आहे. पहिले चालान उत्तर प्रदेशात तर दुसरे दिल्ली येथे कापण्यात आले आहे. फेब्रुवारी २०२२ मध्ये दिल्लीमध्ये जेव्हा तो त्याची मर्सिडीज बेंझ जीएलसी भरधाव वेगाने रस्त्यावर चालवत होता तेव्हा त्याला चालान देण्यात आली तेव्हा त्याची कार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. यासाठी दिल्ली ट्रॅफिक पोलिसांनी पंत यांना २ हजार रुपयांचे चालान पाठवले होते, जे ११ महिने उलटूनही ऋषभने भरलेले नाही.
ऋषभ पंत Mercedes Benz GLC गाडी चालवत होता
अपघाताच्या वेळी ऋषभ पंत जी कार चालवत होता ती मर्सिडीज बेंझ जीएलसी आहे जी प्रीमियम एसयूव्ही आहे. या एसयूव्हीला त्याच्या डिझाईन आणि फीचर्सशिवाय त्याच्या हाय स्पीडसाठीही पसंती दिली जाते.
Mercedes Benz GLC Speed
मर्सिडीज-बेंझ GLC ची किंमत रु. ६१ लाख पासून सुरू होते आणि टॉप मॉडेलसाठी रु. ६६.९० लाखांपर्यंत जाते. या दोन्ही किंमती (एक्स-शोरूम) आहेत. मर्सिडीज बेंझ GLC च्या टॉप स्पीडबद्दल बोलायचे झाले तर ही SUV २१५ kmph च्या वेगाने धावू शकते. याशिवाय, ही एसयूव्ही ७.९ सेकंदात ० ते १०० किलोमीटर प्रति तासाचा वेग देखील मिळवते.