Driving Tips: गाडी चालवताना चुकीच्या पद्धतीने ओव्हरटेकिंग करणे रस्ते अपघातांचे एक प्रमुख कारण आहे. लोक अनेकदा वेळ वाचवण्यासाठी किंवा ट्रॅफिक जाम टाळण्यासाठी ओव्हरटेकिंग करतात. त्यामुळे स्वतःबरोबर इतरांचा जीवही धोक्यात येतो. या सर्व गोष्टी ठाऊक असूनही अनेक जण वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष करून घाईघाईने ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे मोठे अपघात होऊ शकतात. आज आम्ही तुम्हाला चुकीच्या ओव्हरटेकिंगचे काही तोटे सांगणार आहोत; जे लक्षात घेतल्यास तुम्हाला ओव्हरटेकिंगपासून स्वत:ला रोखणे शक्य होईल.
चुकीच्या पद्धतीने गाडी चालविण्याचे तोटे
अपघाताला आमंत्रण देणे
चुकीच्या पद्धतीने ओव्हरटेकिंग केल्याने अपघाताची शक्यता अनेक पटींनी वाढते. समोरून येणाऱ्या वाहनाकडे लक्ष न दिल्यास अपघात होऊन जीवित व वित्तहानी होऊ शकते.
गाडीवरील नियंत्रण गमावणे
ओव्हरटेक करताना गाडीचा वेग आणि दिशा यांवर तुमचे पूर्ण नियंत्रण नसल्यास, गाडीवरचे तुमचे नियंत्रण सुटू शकते. त्यामुळे रस्त्यावरील इतर वाहनांनाही धोका पोहोचू शकतो.
मागून दुसऱ्या गाडीशी टक्कर होण्याची शक्यता
ओव्हरटेकिंग करताना गाडीचालक मागून येणाऱ्या वाहनांकडे लक्ष देत नाही आणि त्यामुळे गाडी मागून धडकण्याचा धोका वाढतो.
रस्त्याच्या बाजूच्या गोष्टींकडे लक्ष द्या
ओव्हरटेक करताना वाहनचालक बऱ्याचदा अनेकदा रस्त्याच्या कडेला उभी असलेली माणसे, जनावरे किंवा इतर अडथळ्यांकडे दुर्लक्ष करतात; ज्यामुळे अपघाताची शक्यता वाढते.
कारवाई होण्याची शक्यता
चुकीच्या पद्धतीने ओव्हरटेकिंग केल्याने तुम्हाला कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागू शकते. वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास दंड, परवाना रद्द किंवा तुरुंगवास यांपैकी एखाद्या शिक्षेला सामोरे जावे लागू शकते.
ट्रॅफिक जॅममध्ये अडकू शकता
चुकीच्या पद्धतीने ओव्हरटेकिंग केल्याने रस्त्यावर ट्रॅफिक जामची परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे केवळ तुमचाच नाही, तर इतरांचाही वेळ वाया जातो.
हेही वाचा: कारची सस्पेंशन सिस्टीम व्यवस्थित ठेवण्यासाठी ‘या’ टिप्स करतील मदत
गाडीचे नुकसान
स्पीड किंवा राँग साइटने ओव्हरटेक केल्याने गाडीचे इंजिन, ब्रेक व टायर यांच्यावर अतिरिक्त दबाव पडतो आणि त्यामुळे त्यांचे आयुष्य कमी होऊ शकते.