Car Sales In Pakistan: पाकिस्तानवर सध्या मोठं आर्थिक संकट कोसळलंय. पाकिस्तानचा कार बाजार आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या आर्थिक संकटात सापडलाय. पाकिस्तानच्या ऑटो मार्केटची स्थिती आता खूपच वाईट झाली आहे. गेल्या वेळच्या तुलनेत कार विक्री अत्यंत कमी झालीये. कारची विक्री होत नसल्याने येथील परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. पाकिस्तान ऑटोमोटिव्ह मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (PAMA) च्या मते, नोव्हेंबर २०२३ मध्ये कार विक्री केवळ ४,८७५ युनिट्सवर घसरली, जी नोव्हेंबर २०२२ च्या महिन्यापेक्षा ६८ टक्के कमी आहे. नोव्हेंबर २०२२ मध्ये देशात १५,४३२ कार विकल्या गेल्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पाकिस्तानातील वाहन उद्योगालाही महागाईचा फटका

पाकिस्तानचे आर्थिक संकट आता इतक्या वाईट पातळीवर पोहोचले आहे की त्याचा परिणाम ऑटोमोटिव्ह मार्केटवर स्पष्टपणे दिसून येत आहे. बहुतांश भागात विक्रीत सातत्याने घट होत आहे. विशेषत: कार मार्केटला मोठा फटका बसत आहे. भारत आणि पाकिस्तानमधील कार विक्रीची तुलना केल्यास, नोव्हेंबरमध्ये भारतात २.८८ लाखांहून अधिक कार विकल्या गेल्या. देशात फक्त मारुती सुझुकीने १.३४ लाखांहून अधिक कार विकल्या आहेत.

(हे ही वाचा : १ लिटर पेट्रोलमध्ये ७० किलोमीटरपर्यंत धावणाऱ्या ‘या’ बाईकचा देशात बोलबाला, खरेदीसाठी हजारो ग्राहक रांगेत, किंमत फक्त…)

त्याच वेळी, नोव्हेंबर २०२३ मध्ये पाकिस्तानमध्ये ४,८७५ कार विकल्या गेल्या आहेत. दिल्लीतही यापेक्षा जास्त गाड्या विकल्या गेल्या आहेत. दिल्लीत ८०,००० हून अधिक नवीन वाहनांची नोंदणी झाली आहे, त्यापैकी सुमारे १८,००० फक्त कार आहेत. म्हणजेच संपूर्ण पाकिस्तानमध्ये जितक्या गाड्या विकल्या गेल्या त्यापेक्षा चारपट जास्त कार एकट्या दिल्लीत विकल्या गेल्या आहेत.

अनेक घटक पाकिस्तानमध्ये नवीन कार खरेदी करण्याच्या ग्राहकांच्या योजना बिघडवत आहेत. कारच्या किमती हा प्रमुख घटक आहे. अलीकडच्या काळात पाकिस्तानमध्ये कारच्या किमतीत सातत्याने वाढ होत आहे. गाड्यांची विक्री कमी होण्यामागे वित्तपुरवठाही एक कारण आहे. वास्तविक, ऑटो फायनान्सिंगचे दर हळूहळू वाढले आहेत. येथील अनेक कार कंपन्यांनी देशातील कारखाने बंद केले आहेत.

पाकिस्तानातील जनता महागाईचा सामना करत आहे. ही महागाई केवळ खाद्यपदार्थांवरच नाही, तर इतर सर्वच वस्तूंवरही दिसून येत आहे. येथे कारच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. त्यामुळे येथील कार खरेदीचे प्रमाण कमी झाले आहे.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pakistan car sales pama in november 2023 a total of 4875 units of cars were sold in pakistan pdb
Show comments