बुलेट फक्त रस्त्यांवरच नाही तर लोकांच्या हृदयावरही राज्य करते. भारतात बुलेटची लोकप्रियता कोणापासून लपलेली नाही. भारतातील लोक या बाईकचे इतके वेडे आहेत की, त्यांच्याकडे पैसा येताच, माणूस सर्वात आधी ही बाईक विकत घेण्याचा विचार करतो. ही बाईक आपल्याकडे असणे म्हणजे शानदार मोटारसायकल आणि भारदस्त व्यक्तिमत्व असणे असे समजले जाते. बुलेटस्वार होऊन सर्वांवर छाप पाडावी अशी अनेक तरुणांची इच्छा असते. तरुणांप्रमाणेच तरुणींमध्येही बुलेटची क्रेझ आता चांगलीच वाढलीय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रॉयल एनफिल्ड नावाच्या कंपनीने बुलेटची निर्मिती केली असून ती जगभर विकली जाते. पण तुम्हाला माहित आहे का की रॉयल एनफिल्ड आपल्या शेजारी देश पाकिस्तानमध्ये बुलेट विकत नाही. पण बुलेट बाईक अशी आहे की ती सगळ्यांनाच वेड लावते. पाकिस्तानातही लोकांना ही बाईक खूप आवडते पण काय करणार, त्यांच्या देशात रॉयल एनफील्ड कंपनी आपली बुलेट विकत नाही. पण आपला बुलेट रायडिंगचा छंद पूर्ण करण्यासाठी पाकिस्तानने कमी बजेटमध्ये बुलेट बाईक तयार केली आहे आणि ही पाकिस्तानातील बुलेट बाईक स्वस्त आहे.

(हे ही वाचा : टाटाच्या ‘या’ SUV कारचा देशभरात जलवा; झाली दणक्यात विक्री, ६ लाख युनिट्स प्रोडक्शनचा गाठला टप्पा )

ही कंपनी पाकिस्तानमध्ये बनवते बुलेट

पाकिस्तानात विकली जाणारी बुलेट रोड प्रिन्स नावाच्या दुचाकी कंपनीने बनवली आहे. पाकिस्तानने बुलेटची कॉपी केली पण या बाईकमध्ये बुलेटसारखे काहीही नाही. भारतीय रुपयात खरेदी केल्यास या बुलेटची किंमत फक्त २४ हजार रुपये आहे. पाकिस्तानी रुपयात त्याची किंमत ७५ हजार रुपये आहे. भारतात बुलेटची सुरुवातीची किंमत १.५ लाख रुपये आहे. या बुलेटमध्ये ७० सीसी इंजिन आहे तर भारतात विकल्या जाणाऱ्या बुलेटमध्ये ३५० सीसी इंजिन आहे. पाकिस्तानी बुलेटमध्ये बसवलेले इंजिन TVS Pep स्कूटीमध्ये वापरले आहे. जे सर्वात कमी पॉवरचे इंजिन मानले जाते.

पाकिस्तानातील या बाईकचं नाव केवळ बुलेट आहे. त्यात रॉयल एनफिल्डच्या बुलेटसारखं काहीही नाही. दिसायलाही ही बाईक बुलेटसारखी दिसत नाही. पाकिस्तानी बुलेटचा पुढचा भाग Hero Honda CD 100 सारखा दिसतो आणि मागचा भाग बजाजच्या BYK बाईकसारखा दिसतो. या दोन्ही बाईक भारतात फार पूर्वीच बंद करण्यात आल्या आहेत. ज्याची पाकिस्तान आज नक्कल करत आहे.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pakistani bullet bike price do you know how much a bullet bike costs in pakistan pdb