रोड सेफ्टी अर्थात् रस्ता सुरक्षा हा मुद्दा नेहमीच चर्चेचा मुख्य विषय राहिला आहे. जगभरात रस्ते अपघातांमुळे होणाऱ्या मृत्यूंचं प्रमाण वाढत आहे. भारतातही दर वर्षी सुमारे दीड लाख व्यक्ती रस्ते अपघातात मरण पावतात. याच पृष्ठभूमीवर अल्पवयीन मुलांना ड्रायविंग पासून रोखण्यासासाठी सरकार आता कडक पावलं उचलत आहे. लहान मुलाला बाईक, कार किंवा कार चालवायला परवानगी देणाऱ्या आई-वडिलांवर कारवाई केली जावू शकते. पोलिसांच्या माहितीनुसार, जर १८ वर्षांपेक्षा कमी वयाचा मुलगा ड्रायविंग चालवताना पकडल्या गेल्यास त्यांच्या आई-वडिलांना दंड ठोठावला जावू शकतो. यासंबंधी सविस्तर जाणून घ्या.
१८ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना वाहन चालवण्यास देऊ नका
१८ वर्षांखालच्या मुलांना वाहन चालवण्यास देऊ नये, असा नियम आहे. तुमचं स्वत:चं मूल असेल तरीही अशी चूक करू नका. कारण, कायदे तयार करताना नातेसंबंधांचा नाही, तर वयाचा निकष विचारात घेतला जातो. म्हणून अल्पवयीन मुलांच्या हातात गाडी देऊ नका.
(आणखी वाचा : Driving Licence विसरलं अन् पोलिसांनी पकडलं, आता कसं? व्हा टेंशन फ्री, कारण…)
२५ हजार रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो
भारतातल्या कोणत्याही परिवहन कार्यालयाने वयाच्या १८व्या वर्षापर्यंत कोणालाही वाहन चालविण्याचा परवाना देऊ नये, असा कायदा आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, जर १८ वर्षांपेक्षा कमी वयाचा मुलगा ड्रायविंग चालवताना पकडल्या गेल्यास त्यांच्या आई-वडिलांना २५ हजार रुपयांपर्यंत दंड लावला जावू शकतो. संबंधित विभागाने (वाहतूक विभाग किंवा वाहतूक पोलीस) पाठवलेल्या चलनाची दंडाची रक्कम १५ दिवसांच्या आत जमा करणंदेखील बंधनकारक असतं.
असाच एक प्रकार उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यात नुकताच समोर आला आहे. येथे अपघात रोखण्यासाठी सुरू असलेल्या मोहिमेचा एक भाग म्हणून, पोलिसांनी कर्णप्रयागमध्ये दुचाकी चालवणाऱ्या दोन किशोरवयीन मुलांना चालन दिली. लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे हे चालन ५०० किंवा १००० रुपयांचे नव्हते तर पूर्ण २५,००० रुपयांचे होते.