Petrol and Diesel Price Today: महाराष्ट्रातील पेट्रोलच्या किमती डायनॅमिक इंधन किंमत प्रणालीवर आधारित आहेत आणि त्यामुळे नियमितपणे सुधारित केल्या जातात. दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोलचे दर सुधारले जातात. अनेक घटक पेट्रोलची किंमत ठरवतात – जसे की रुपया ते अमेरिकन डॉलर विनिमय दर, कच्च्या तेलाची किंमत, जागतिक संकेत, इंधनाची मागणी, इतर. जेव्हा आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमती वाढतात तेव्हा भारतात इंधनाच्या किमती वाढतात.
इंधर दरवाढ का? : भारत आपल्या गरजेच्या ८० टक्के इंधन परदेशातून आयात करतो. करोनाच्या काळात किमती घसरल्यानंतर जगभरात नोव्हेंबर २०२० पासून तेल आणि गॅसच्या किमती सातत्याने वाढत आहेत. २२ मार्च रोजी ५० रुपयांच्या वाढीनंतर भारतात १४.२ किलोच्या घरगुती सिलिंडरची किंमत नोव्हेंबर २०२० पासून ६० टक्क्यांनी वाढली आहे. जगातील पेट्रोलियम पदार्थांच्या किमती नियंत्रित करण्यात सौदी अरेबियाचा मोठा वाटा आहे. नोव्हेंबर २०२० पासून सौदी अरेबियाच्या सरकारी मालकीच्या तेल कंपनी सौदी अरामकोने गॅसची किंमत ३७६ मेट्रिक टनांवरून ७६९ मेट्रिक टनांपर्यंत वाढवली आहे. या काळात कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल ४१ अमेरिकन डॉलरवरून ११५.४ अमेरिकन डॉलर प्रति बॅरलपर्यंत वाढल्या आहेत. अशा परिस्थितीत तेल आणि गॅसच्या किमती फार काळ नियंत्रणात ठेवणे भारतासारख्या देशाला शक्य नाही.
रशिया युक्रेन युद्ध: अमेरिका आणि सौदी अरेबियानंतर रशिया हा जगातील तिसरा सर्वात मोठा तेल उत्पादक देश आहे. रशिया आणि युक्रेन युद्ध सुरु असल्याने निर्यात केलेल्या कच्च्या तेलापैकी ६५ टक्के तेल आंतरराष्ट्रीय बाजारात येत नाही. त्यामुळे जगात तेलाचे मोठे संकट निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कच्च्या तेल आणि गॅसच्या किमती झपाट्याने वाढत आहेत. २४ फेब्रुवारीपासून रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू झाले आहे. युद्ध सुरू झाल्यानंतर कच्च्या तेलाची किंमत ७ मार्च रोजी प्रति बॅरल ९० डॉलरवरून वाढून १४० डॉलर प्रति बॅरलवर पोहोचली. मात्र त्यानंतर कच्च्या तेलाच्या किमती खाली आल्या. सध्या कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल प्रति बॅरल ११५ डॉलरच्या आसपास आहे.
शहर | पेट्रोल (प्रति लिटर ) | डिझेल (प्रति लिटर ) |
अहमदनगर | ११३.८७ | ९६.६० |
अकोला | ११३.३१ | ९६.१० |
अमरावती | ११४.३९ | ९७.१३ |
औरंगाबाद | ११३.३७ | ९६.१३ |
भंडारा | ११४.०३ | ९६.७९ |
बीड | ११५.०१ | ९७.७२ |
बुलढाणा | ११३.७७ | ९६.५३ |
चंद्रपूर | ११३.४५ | ९६.२४ |
धुळे | ११३.०८ | ९५.८६ |
गडचिरोली | ११४.२९ | ९७.०५ |
गोंदिया | ११४.५५ | ९७.२८ |
बृहन्मुंबई | ११३.३५ | ९७.५५ |
हिंगोली | ११४.०१ | ९६.७७ |
जळगाव | ११३.४१ | ९६.१७ |
जालना | ११४.८६ | ९७.५६ |
कोल्हापूर | ११३.४२ | ९६.२० |
लातूर | ११४.१४ | ९६.८८ |
मुंबई शहर | ११३.३५ | ९७.५५ |
नागपूर | ११३.०६ | ९५.८५ |
नांदेड | ११५.४५ | ९८.१५ |
नंदुरबार | ११४.२१ | ९६.९४ |
नाशिक | ११३.७४ | ९६.४५ |
उस्मानाबाद | ११३.८१ | ९६.५७ |
पालघर | ११३.४२ | ९६.१४ |
परभणी | ११६.४२ | ९६.०६ |
पुणे | ११२.८७ | ९५.६४ |
रायगड | ११३.०८ | ९५.८२ |
रत्नागिरी | ११४.४९ | ९७.२० |
सांगली | ११३ | ९५.७९ |
सातारा | ११३.७१ | ९६.४८ |
सिंधुदुर्ग | ११४.९२ | ९७.६४ |
सोलापूर | ११३.४१ | ९६.१६ |
ठाणे | ११३.४२ | ९७.६१ |
वर्धा | ११३.५४ | ९६.३२ |
वाशिम | ११३.९० | ९६.६६ |
यवतमाळ | ११४.४० | ९७.१४ |