Petrol-vs-Diesel who better in india: नवीन कार विकत घेणाऱ्यांच्या डोक्यात नेहमीच पेट्रोल कार घ्यावी की डिझेल कार असा प्रश्न पडलेला असतो. त्यासाठी ते अनेक कारमालकांचे, सोशल मीडियावरील माहितीदारांचे मत जाणून घेण्याचा प्रयत्न करतात. पण, तरीही अनेकदा हा प्रश्न सुटता सुटत नाही. खरं तर कोणतीही गोष्टी स्वतः वापरून पाहत नाही तोपर्यंत ती आपल्यासाठी किती योग्य आहे याची माहिती आपल्याला मिळत नाही. पण, याबाबत योग्य माहिती जाणून घेतल्यास तुमच्या डोक्याचा हा गोंधळ नक्कीच दूर होऊ शकतो.
पेट्रोल आणि डिझेलमध्ये जास्त खर्चिक काय?
पेट्रोल आणि डिझेल कारमधील एकूण देखभाल खर्चात फरक असू शकतो. डिझेल कारमधील इंजिनची यंत्रणा गुंतागुंतीची आहे. त्यांच्या जटिल इंजिनांमुळे जास्त पैसे मोजावे लागतात. डिझेलच्या तुलनेत पेट्रोल कारचा देखभालीचा खर्च कमी असतो .
चांगले मायलेज कोण देईल?
कोणतीही नवीन कार खरेदी करताना मायलेजशी संबंधित प्रश्न विचारले जातात. पेट्रोलच्या तुलनेत डिझेल इंजिनवर चालणारी कार चांगले मायलेज देते. पेट्रोल इंजिनच्या तुलनेत डिझेल इंजिन कमी ज्वलनशील आहे. मायलेजबद्दल बोलायचे झाल्यास, डिझेल वाहनाचे मायलेज पेट्रोल वाहनाच्या तुलनेत सरासरी २०-२५ टक्के जास्त असते.
पेट्रोल आणि डिझेल कारच्या आयुर्मानात फरक
पेट्रोल आणि डिझेल या दोन्ही गाड्यांची योग्य देखभाल केल्यास त्यांचे आयुष्य सारखेच असू शकते. परंतु, डिझेल इंजिन त्याच्या मजबूत बांधणीमुळे जास्त काळ टिकते. आधुनिक पेट्रोल इंजिनेदेखील टिकाऊ असण्यासाठी डिझाइन केलेली आहेत.
हेही वाचा: पावसाळा संपल्यानंतर अशी घ्या कारची विशेष काळजी; ‘या’ पाच महत्त्वाच्या टिप्स लक्षात घ्या
पेट्रोल आणि डिझेल यांपैकी खिशाला परवडणारे काय?
पेट्रोल इंजिन असलेल्या गाड्यांच्या तुलनेत ग्राहकांना डिझेल इंजिन असलेल्या गाड्यांसाठी अधिक पैसे मोजावे लागतात. अनेक गाड्यांमध्ये हा फरक हजारो किंवा लाखो रुपयांपर्यंत जाऊ शकतो. पेट्रोलच्या तुलनेत डिझेल इंजिनची क्षमता जास्त असते आणि डिझेल इंजिन जास्त टॉर्क जनरेट करते, जे उत्तम परफॉर्मन्स देते. त्याचवेळी पेट्रोल इंजिन अधिक हॉर्सपॉवरसह येतात, जे वेगवान एक्सीलेरेशन देते. डिझेल इंजिन बऱ्याचदा चांगली इंधन कार्यक्षमता देतात, पण पेट्रोल कारचा खर्च आणि देखभाल खर्च कमी असतो.