पेट्रोल आणि डिझेलच्या दर रोज वाढत आहेत. गेल्या दोन आठवड्यात १२ वेळा दरवाढ झाली आहे. दोन आठवड्यांपेक्षा कमी कालावधीत एकूण दर ८ रुपये प्रति लिटरने वाढले. उपलब्ध किंमत यादीनुसार, महाराष्ट्रातील परभणीमध्ये सामान्य पेट्रोलची किंमत १२१.३८ रुपये तर, डिझेलची किंमत १०३. ९७ रुपये आहे. दरम्यान, राजस्थानमधील श्रीगंगानगरमध्येही इंधनाच्या दरांमध्ये प्रचंड वाढ होत आहे. तिकडे पेट्रोल १२०.७३ रुपये आणि डिझेल १०३.३० रुपये दराने विकले जात आहे.
कारण काय?
“परभणीत इंधनाची किंमत जास्त आहे कारण ते येथे ३४०किलोमीटर अंतरावर असलेल्या मनमाड डेपोतून आणले जाते. आम्ही औरंगाबादमध्ये डेपो स्थापन करण्याची मागणी केली आहे, ज्यामुळे इंधनाचे दर प्रति लिटर २ रुपये कमी होतील,” परभणी पेट्रोल डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष अमोल भेडसुरकर यांनी पीटीआयला सांगितले. इंधन जीएसटीच्या कक्षेत आणल्यास लोकांना जास्तीत जास्त दिलासा मिळेल, असेही ते म्हणाले.
(हे ही वाचा: Toll Tax Hike: पेट्रोल-डिझेलनंतर जनतेला आणखी एक फटका! आजपासून टोल टॅक्स महागला)
लक्षात घेण्यासारखे आहे की, गेल्या वर्षी ३ नोव्हेंबर रोजी केंद्राने देशभरातील किरकोळ किमती कमी करण्यासाठी पेट्रोलवर प्रति लिटर ५ रुपये आणि डिझेलवर १० रुपये प्रति लिटर उत्पादन शुल्कात कपात केली होती. यानंतर, अनेक राज्य सरकारांनी लोकांना दिलासा देण्यासाठी पेट्रोल आणि डिझेलवरील मूल्यवर्धित कर (व्हॅट) कमी केला होता.