Piaggio (Vespa ची मूळ कंपनी) ने वेस्पा स्कूटरची प्रीमियम रेंजला BS ६ फेज II नॉर्म्स सह अपडेटे केले आहे. या अपडेटसह कंपनीने दोन नवीन व्हेरिएंट वेस्पा १२५ आणि वेस्पा १५० लॉन्च केले आहेत. या स्कूटरमध्ये देण्यात आलेले नवीन ड्युअल टोन फिचर या स्कूटरना इतरांपेक्षा वेगळे बनवते. या स्कूटरमध्ये कोणकोणत्या गोष्टी अपडेट करण्यात आल्या आहेत. तसेच याचे फीचर्स ,किंमत याबद्दल अधिक गोष्टी जाणून घेऊयात.
इंजिन आणि गिअरबॉक्स
व्हेस्पा ड्युअल एसएक्सएल आणि व्हीएक्सएल सीरिजच्या १२५ प्रकारांमध्ये सिंगल सिलेंडर, फ्युएल इंजेक्टेड, एअर कूल्ड तंत्रज्ञानावर आधारित १२४. 45 सीसी इंजिन देण्यात आले आहे. स्कूटरला पॉवर देणारे इंजिन 9.8 BHPchi पॉवर आणि 9 आहे. 6 Nm टॉर्क जनरेट करते. Vespa Dual SXL आणि VXL सिरीजच्या 150 cc प्रकारांना सिंगल सिलेंडर, एअर कूल्ड तंत्रज्ञानावर आधारित 149.5 cc इंजिन मिळते. हे इंजिन 10.3 Bhp पॉवर आणि 10.6 Nm टॉर्क निर्माण करते. याबाबतचे वृत्त financial express ने दिले आहे.
किंमत
Piaggio (Vespa ची मूळ कंपनी) ने भारतीय बाजारपेठेत Vespa SXL अणि VXL सीरीजच्या स्कूटर्स ड्युअल टोन रंगांमध्ये लॉन्च केल्या आहेत. Vespa SXL आणि VXL मालिकेतील 125 आणि 150 cc प्रकार बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहेत. Vespa ड्युअल सीरिजच्या नवीन स्कूटरची किंमत १.३२ लाख (एक्सशोरूम ) रुपयांपासून सुरु होते.
Vespa VXL 125 ची किंमत १. ३२ लाख (एक्स-शोरूम) रुपये इतकी आहे. तर Vespa VXL 150 ची किंमत १. ४६ लाख (एक्स-शोरूम) रुपये इतकी आहे. या स्कूटरमध्ये राउंड हेडलॅम्प देण्यात आले आहेत. या स्कूटरचा लूक हा रेट्रो लूक आहे. म्हणजेचा हीचा लुक हा जुन्या काळातील स्कूटरप्रमाणे आहे.