देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत. त्यामुळे अनेकांना पेट्रोल आणि डिझेलवरील गाड्या वापरणे परवडत नाही. यामुळे अनेक जण इलेक्ट्रिक कार खरेदी करत आहेत. आज जगातील सर्वोत्तम वेगवान इलेक्ट्रिक कारबद्दल सांगणार आहोत. जगातील सर्वात वेगवान इलेक्ट्रिक कार कोणती आहे हे तुम्हाला माहिती आहे का? जर नसेल तर आज तुम्हाला अशाच एका कारबद्दल सांगणार आहोत.
‘ही’ आहे जगातील सर्वात वेगवान इलेक्ट्रिक कार
भारतीय कार निर्माता कंपनी महिंद्रा आता जगभरात आपला दबदबा निर्माण करत आहे. कंपनीच्या एसयूव्ही आणि एमपीव्हीला ग्राहकांची पसंती मिळत आहे. कंपनी भारतासोबतच परदेशातही ग्राहकांना आपल्याकडे खेचण्यास यशस्वी ठरली आहे. आता कंपनीच्या कारने वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. महिंद्राच्या मालकीची कंपनी असलेल्या ऑटोमोबाइल पिनीनफेरिना च्या ‘Battista हायपरकार’ने हा रेकॉर्ड केला आहे. ही जगातील सर्वात वेगवान इलेक्ट्रिक कार ठरली आहे, महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनी सोशल मीडिया साईट ट्विटरवर एक पोस्ट शेअर करत ही माहिती दिली आहे.
(आणखी वाचा : झकास! बॉलीवूड अभिनेता अनिल कपूरचा त्याच्या ‘या’ लक्झरी कारसोबतचा फोटो झाला व्हायरल )
कारने मोडला जुना रेकॉर्ड
या कारने एक नवीन वर्ल्ड रेकॉर्ड सेट केला आहे. या इलेक्ट्रिक कारने फक्त १.७९ सेकंदात ० ते १०० किलोमीटर प्रति तासाचा वेग पकडून सर्वांनाच चकीत केले आहे. महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्राने Twitter वर एक पोस्ट करत सांगितले की, त्यांची कंपनी महिंद्रा ऑटोमोबाइल पिनीनफेरिनाची हायपरकार Battista जगातील सर्वात वेगवान इलेक्ट्रिक कार बनली आहे. या कारची खास गोष्ट म्हणजे, ही स्ट्रीट-लीगल फास्टेस्ट कार बनली आहे. या कारने तिचाच जुना रेकॉर्ड मोडला आहे. यापूर्वी या कारने १.८६ सेकंदात ० ते १०० किमी प्रति तास इतका वेग धारण केला होता. या कारला १९३ किमी प्रति तास इतका वेग पकडण्यासाठी केवळ ४.४९ सेकेंद लागले होते. यात पॉवरफुल ब्रेक्स देखील देण्यात आले आहेत.
महिंद्रा यांच्या या ट्विटनंतर यूजर्सकडून त्यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत. एका यूजरने ट्विट करत कारच्या किंमतीची माहिती देखील दिली. यूजरनुसार, कारची किंमत जवळपास २० कोटी रुपये आहे.