Monsoons Tips: जुलै महिना सुरू झाला असला तरी अजूनही काही ठिकाणी हवा तसा पाऊस पडलेला नाही. पण, सध्याचे वातावरण पाहता कधी मुसळधार पाऊस सुरू होईल हे सांगता येत नाही. मुसळधार पावसात बाईक, स्कूटर चालवणे टाळले पाहिजे, परंतु अनेकदा लोक अशा काही चुका करतात ज्यामुळे त्यांना मोठे नुकसान सहन करावे लागते. पावसाळ्याच्या दिवसात बाईक आणि स्कूटर मालकांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो. त्यामुळे पावसाळ्यात काही अतिरिक्त सावधगिरी बाळगणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी खालील टिप्सचे अवश्य पालन करा.

वॉटरप्रूफ जॅकेट

पावसाळ्यात बाईकवर फिरायला जाताना सर्वात महत्त्वाचं म्हणजे एक वॉटरप्रूफ जॅकेट घ्या. जेव्हा तुम्ही मोटारसायकल घेऊन डोंगराकडे जाता, त्याआधी तुम्ही स्वत:जवळ उबदार कपडे ठेवा. शक्य असल्यास, काही अतिरिक्त उबदार कपडे देखील जवळ ठेवा. कारण, सपाट भागांपेक्षा पर्वतांमध्ये जास्त थंडी वाजत असते. अशा परिस्थितीत, आपल्याला अतिरिक्त उबदार कपड्यांची आवश्यकता भासू शकते. अशा थंडीच जर तुमच्याजवळ लेदर जॅकेट असेल तर अधिक चांगले. कारण, लेदर जॅकेट मोटारसायकलवरील थंडीपासून तुमचे रक्षण करते.

मेडिकल किट

या दिवसात कुठेही पिकनीकला जाताना सोबत एक मेडिकल किट असणं गरजेचं आहे. काही हो अथवा न हो सोबत असलेली बरी. कारण ज्या ठिकाणी तुम्ही जाताय तिथे काहीही होऊ शकतं. अशी ठिकाणं शहरांपासून किंवा गावांपासून जरा लांब असतात. अशावेळी काही झाल्यास वेळेवर मदत न मिळाल्याने मोठा अनर्थ होऊ शकतो. त्यामुळे एक मेडिकल किट सोबत ठेवाच. वॉटरप्रूफ बॅग किंवा कव्हरसह फोन, चार्जर आणि लॅपटॉप यांसारख्या इलेक्ट्रॉनिक वस्तू कोणत्याही प्रकारच्या पाण्यापासून दूर ठेवल्या जाव्यात याची देखील तुम्हाला खात्री करणे आवश्यक आहे.

मोटारसायकलची सर्व्हिसिंग करा

तुम्ही सहलीला जाण्यापूर्वी आपल्या मोटारसायकलची सर्व्हिसींग करून घ्या. कारण, डोंगराळ रस्त्यावर अचानक मोटारसायकल बंद पडते. अशा वेळी बऱ्याचदा डोंगराळ भागात तुम्हाला मेकॅनिक मिळत नाही. अशा स्थितीत मोटारसायकलला काही अडचण आली, तर तुम्हाला फसल्यासारखे वाटते. त्यामुळे सहलीला निघण्यापूर्वी मोटारसायकलची सर्व्हिस करा, त्यामुळे तुम्हाला डोंगराळ भागातील रस्त्यांवर काही अडचण येणार नाही.

हेही वाचा >> BMW Electric Scooter: बीएमडब्ल्यूची इलेक्ट्रिक स्कूटर भारतात धमाका करणार; किंमत आणि जबरदस्त वैशिष्ट्ये जाणून घ्या

बॅकअप प्लॅन तयार ठेवा

दिवसाच्या राइडसाठी आपल्या मार्गाचे नियोजन करणे कोणत्याही परिस्थितीत आवश्यक आहे. पावसाळ्यात, अतिरिक्त तयारी ठेवा. काही वेळा, तुम्ही नियोजित स्थळांवर वेळेवर पोहोचू शकत नाही आणि अशावेळी नेहमी बॅकअप प्लॅन तयार ठवा.