भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी सोहळा यंदा दिमाखात पार पडला. हर घर तिरंगा मोहिमेमुळे यंदा केवळ लाल किल्ल्यावरच नव्हे तर देशातील प्रत्येक दारात झेंडा झळकला होता. दरवर्षी या सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणावर सर्वांचे लक्ष वेधलेले असते यंदा मात्र त्यांच्या एंट्रीपासूनच सर्वजण थक्क झाले होते. मोदी १५ ऑगस्टच्या सोहळ्यासाठी रेंज रोव्हर सेंटीनएल (Range Rover Sentinel) या आपल्या आवडत्या गाडीतून प्रवेश केला. ही गाडी जगभरातील ऑटोमोबाईल क्षेत्रात सर्वात सुरक्षित गाडी म्हणून ओळखली जाते. या गाडीचे भन्नाट फीचर व किंमत वाचून तुम्ही सुद्धा थक्क व्हाल..
रेंज रोव्हर सेंटीनएल कोणत्याही प्रकारच्या हल्ल्याला सहज सहन करू शकते. अगदी गोळीबार किंवा बॉम्बस्फोट किंवा आईडी ब्लास्ट मध्ये देखील आत बसलेल्या व्यक्तीला कोणतीही इजा होणार नाही याची पूर्ण खबरदारी घेऊन या कारची डिझाईन करण्यात आली आहे. पंतप्रधानांच्या ताफ्यातील गाड्यांमध्ये ही कार मोदींची सर्वात आवडती असल्याचे म्हंटले जात आहे.
Royal Enfield घेऊन येणार इलेक्ट्रिक बुलेट; एका चार्जिंग मध्ये 150 km धावणार, पहा फीचर्स
रेंज रोव्हर सेंटीनएलचे टायर्स सुद्धा विशेष तंत्रज्ञान वापरून बनवण्यात आले आहेत. एखाद्या अपघातात किंवा दुर्घटनेत जर टायर खराब झाले तरी ही कार १०० किलोमीटर प्रवास करता येऊ शकतो. पाणी, चिखल व दगडांमधून अत्यंत सुरक्षितरित्या प्रवास करण्यास ही गाडी सक्षम आहे. ही गाडी गॅस व केमीकलच्या हल्ल्याला सुद्धा निकामी करते, जेणेकरून ऍसिड हमला किंवा कोणत्याही रासायनिक हल्ल्यात सुद्धा आत बसलेल्या प्रवाशाला इजा होणार नाही.
रेंज रोव्हर सेंटीनएल इंजिन व किंमत
रेंज रोव्हर सेंटीनएल गाडीच्या सुरक्षा फीचर्स इतकेच प्रभावशाली त्याचे इंजिन सुद्धा आहे. या कार मध्ये जॅग्वार सोर्स्ड ५.०-लीटर, सुपरचार्ज्ड V8 इंजिन वापरण्यात आले आहे. या इंजिनची ३७५bhp इतकी ताकद असून ५०८nm चा पीक टॉर्क जनरेट करण्यात ही गाडी सक्षम आहे.
Video: सायकल मुळे बे’चैन’ व्हायचे दिवस गेले! Chainless Cycle चे फीचर व किमंत जाणून घ्या
दरम्यान, हे सगळे फीचर्स ऐकून पाहून आपण या गाडीची किंमत जाणून घेण्यासाठी उत्सुक असालच.. प्राप्त माहितीनीसार पंतप्रधान मोदींच्या रेंज रोव्हर सेंटीनएल कारची किंमत तब्ब्ल १० ते १५ कोटीच्या दरम्यान आहे. या गाडीला मोदींच्या आवडीनुसार व सुरक्षेला लक्षात घेऊन कस्टमाइज करण्यात आले आहे.