चांगले मायलेज आणि कमी खर्चामुळे ग्राहकांचा ई वाहनांकडे कल वाढला आहे. वाहन निर्मात्यांनाही ही बाब लक्षात आली असून त्यांनी देखील ई वाहन निर्मितीला सुरुवात केली आहे. काही कंपन्या छोट्या इलेक्ट्रिक कार बनवत आहेत. पार्किंग स्पेस कमी घेत असल्याने ग्राहकांना त्या भूरळ घालतात. मुंबईतील स्टार्ट अप कंपनी पीएमव्ही इलेक्ट्रिक देखील आता ग्राहकांसाठी एक छोटी इलेक्ट्रिक कार उपलब्ध करणार आहे.
कंपनी १६ नोव्हेंबर रोजी ईएएस – ई या आपल्या मायक्रो इलेक्ट्रिक कारचे पदार्पण करणार आहे. विशेष म्हणजे, या इलेक्ट्रिक कारची किंमत ४ लाखांपासून (एक्स शोरूम) सुरू होणार आहे.
(आता ई वाहनांसाठी नव्या सुरक्षा चाचण्या, अनेक दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर सरकारचा निर्णय)
इतकी मिळेल रेंज
PMV EaS – E या कारमध्ये १० किलोवॉट हवरची लिथियम आयर्न फॉस्फेट बॅटरी मिळणार आहे, जी 15 किलो वॉट (१२ बीएचपी) पीएमएसएम इलेक्ट्रिक मोटरशी जोडलेली असेल. या कारचा सर्वाधिक वेग ७० किमी प्रति तास असेल. कार तीन व्हेरिएंटमध्ये मिळेल. व्हेरिएंटच्या भिन्नतेनुसार प्रत्येक चार्जवर १२० ते २०० किमी पर्यंतची रेंज मिळेल, असा कंपनीचा दावा आहे.
हे असतील फीचर
३ किलोवॉट एसी चार्जरने कार चार तासांत पूर्ण चार्ज होईल, असा कंपनीचा दावा आहे. कारची लांबी २९१५ मिमी, रुंदी, ११५७ मिमी, उंची १६०० मिमी असेल. कारचा व्हिलबेस २ हजार ८७ मिमीचा असेल. ईएएस – ई कारमध्ये डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, टच स्क्रिन इन्फोटेन्मेंट सिस्टिम, यूएसबी चार्जिंग पोर्ट, एअर कंडिशनिंग, क्रुझ कंट्रोल आणि रिअर पार्किंग कॅमेरा मिळेल. कारच्या पदार्पणासाठी आम्ही उत्साहित आहोत.
(मुहूर्त ठरला! ‘या’ दिवशी होणार SUPER METEOR 650 चे पदार्पण, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स)
कारच्या पदार्पणासाठी आम्ही उत्साहित आहोत. कंपनीसाठी हा मैलाचा दगड ठरेल. भारतीय कंपनी म्हणून आम्ही जागतिक दर्जाचे उत्पादन तयार केले आहे, अशी प्रतिक्रिया पीएमव्ही इलेक्ट्रिकचे संस्थापक कल्पित पटेल यांनी दिली.