कार निर्माण करणारी जर्मनीतील पोर्शे कंपनीनं भारतात दोन इलेक्ट्रिक गाड्या लॉन्च केल्या आहेत. पोर्शे Taycan EV आणि Macan Facelift अशी या दोन गाड्यांची नावं आहेत. या गाड्यांबद्दल भारतीय कारप्रेमींमध्ये प्रचंड आकर्षण आहे. त्यामुळे या गाड्यांमध्ये नेमकं काय आहे? याची उत्सुकता आहे. Taycan EV ची किंमत ही शोरुममध्ये येण्यापूर्वी १.५२ कोटी रुपये इतकी आहे. तर Macan Facelift ची किंमत शोरूममध्ये येण्यापूर्वीची किंमत ८३.२१ लाख रुपये आहे.

पोर्शे Taycan EV

पोर्शेची ही पहिलीवहिली पूर्ण इलेक्ट्रिक कार आहे. ही गाडी दोन बॉडी स्टाईलमध्ये आहे. टायकन सेडान आणि टायकन क्रॉस टूरिस्मो इस्टेट अशा प्रकारात उपलब्ध आहे. टायकन सेडानमध्ये चार प्रकार असून स्टँडर्ड, 4एस, टर्बो आणि टर्बो एस हे प्रकार आहेत. तर टायकन क्रॉस टूरिस्मो इस्टेटमध्ये तीन प्रकार आहेत. 4एस, टर्बो आणि टर्बो एस असे प्रकार आहेत.टायकनचा बेस व्हेरिंएट ४०२ बीएचपी पॉवर जनरेट करते आणि ७९.२ केडब्यूएच बॅटरी पॅकचा वापर करते. याला रिअर व्हील ड्राइव्ह आहे. टायकन 4एसमध्ये ड्युअल मोटर सेटअप देण्यात आला आहे. ही ५२३ बीएचपीची पॉवर जनरेट करते आणि फक्त ४.० सेकंदात ० ते १०० किमी प्रतितास वेग वाढवू शकते. दुसरीकडे दुसरीकडे, Cross Turismo 4एस ५६३ बीएचपीची पॉवर जनरेट करते. टायकन टर्बो ६७१ बीएचपी आणि ८५० एनएम पॉवर निर्माण करते. तर टर्बो एस ७५१ बीएचपी आणि १०५० एनएम निर्माण करते. टर्बो एस फक्त २.८ सेकंदात ० ते १०० किमी प्रतितास वेग वाढवू शकते. टायकन बेस आणि 4 एस प्रकार ७९.२ केडब्ल्यूएच क्षमतेच्या बॅटरी पॅकसह येतात. जे ४८४ किमी पर्यंत ड्रायव्हिंग रेंज देतात. टर्बो आणि टर्बो एस प्रकारांमध्ये मोठी ९३.४ केडब्ल्यूएच बॅटरी मिळते जी जास्तीत जास्त 456 किमी ड्रायव्हिंग रेंज देते.

डेबिट कार्डशिवायही तुम्ही SBI ATM मधून काढू शकता पैसे, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

पोर्शे Macan Facelift

नवीन मॅकन फेसलिफ्टमध्ये मागील मॉडेलच्या तुलनेत काही बदल दिसून येतात. आतील लेआउटदेखील बदलला आहे. मॅकनच्या एंट्री-लेव्हल व्हेरिएंटमध्ये २.० लिटर टर्बोचार्ज केलेले ४ सिलेंडर इंजिन आहेत. हे इंजिन २६१ बीएचपी पॉवर जनरेट करतात. ही कार ६.२ सेकंदात ० ते १०० किमी प्रतितास वेग पकडू शकते. कारचा टॉप स्पीड २३२ किमी प्रतितास आहे. मॅकन जीटीएसध्ये २.६ लिटर व्ही-६ द्वि-टर्बो इंजिन आहे. हे इंजिन ४३४.५ बीएचपी पॉवर जनरेट करते, जे मागील मॉडेलपेक्षा ५९ बीएचपी अधिक आहे. ही आवृत्ती ४.३ सेकंदात ० ते १०० किमी प्रतितास वेग वाढवू शकते. त्याचा टॉप स्पीड २७२ किमी प्रतितास आहे. मॅकन एसमध्ये २.९ लिटर व्हि-६ इंजिन आहे. हे इंजिन ३७५ बीएपी पॉवर जनरेट करते. मागच्या मॉडेलपेक्षाा २७ बीएचपी जास्त आहे. हे मॉडेल ० ते १०० किमी प्रतितास ४.६ सेकंदात वेग घेऊ शकते.

Story img Loader