बऱ्याचदा कार किंवा बाइक एक ठिकाणी दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळ उभी राहिली तर टायरमधील हवा कमी होते. त्यामुळे अनेकदा धक्के मारून गाडी गॅरेजमध्ये किंवा हवा भरण्याच्या ठिकाणी न्यावी लागते. यासाठी चांगलाच घाम गाळावा लागतो. कधी कधी प्रवासात असताना गाडीत हवा कमी झाली की, मोठी समस्या निर्माण होते. या समस्येवर मात करण्यासाठी पोर्ट्रोनिक्सने पोर्टेबल टायर इन्फ्लेटर पोर्ट्रोनिक्स वायु लॉन्च केले आहे. हा एक पोर्टेबल एअर पंप आहे. यामुळे तुम्हाला कुठेही, कधीही, कोणत्याही वाहनात किंवा सायकलमध्ये हवा भरू शकता. पोर्टोनिक्स वायु विविध आकार आणि फंक्शन्सच्या नोझल्ससह येते आणि हे प्रेस्टा व्हॉल्व्ह अॅडॉप्टर सक्षम मॉडेल आहे. यात ४००० एमएएचची शक्तिशाली बॅटरी आहे, ज्याचे आउटपुट ५० वॅट आहे. त्याच्या मदतीने तुम्ही कोणत्याही वाहनाच्या टायरमध्ये काही मिनिटांत हवा भरू शकता. पोर्ट्रोनिक्स वायुच्या वैशिष्ट्यांबद्दल जाणून घेऊया…
या माध्यमातून फक्त ९ मिनिटांत कारचे टायर पूर्णपणे भरता येतो. युनिट आपोआप हवेचा दाब ओळखते आणि हवा भरल्यानंतर थांबते. वापरकर्ते त्यांच्या सोयीनुसार ते मॅन्युअली देखील सेट करू शकतात. कार मोड, मोटरसायकल मोड, सायकल मोड आणि बॉल मोडमध्ये येतो. अशा प्रकारे तुमची प्रत्येक गरज पूर्ण होते. डिव्हाइसमध्ये एलईडी डिजिटल डिस्प्ले देखील आहे ज्यामध्ये त्याच्या वापराबद्दल माहिती उपलब्ध आहे. पोर्ट्रोनिक्स टाइप-C USB चार्जिंग केबलसह येते. एअर एका चार्जवर १५० पीएसआय प्रेशरने हवा भरू शकते. हे तुमच्याकडे असलेल्या वाहनाच्या प्रकारावर अवलंबून आहे. तुम्ही तुमच्या डिव्हाइसनुसार PSI प्रेशर युनिट बदलू शकता. टायरचा दाब तपासण्यासाठी यात डिजिटल डिस्प्ले देखील आहे. हे १८,६५० एमएएच लिथियम-आयन बॅटरीद्वारे समर्थित आहे, एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर पाच कार टायर किंवा आठ सायकल टायर भरण्यास सक्षम असल्याचा दावा केला जातो.
या पोर्ट्रोनिक्स युनिटची Xiaomi च्या Mi पोर्टेबल इलेक्ट्रिक एअर कंप्रेसरशी स्पर्धा असेल. भारतीय बाजारात ३,४९९ रुपयांना उपलब्ध आहे.. इलेक्ट्रिक एअर कॉम्प्रेसर पॉवर बँकने देखील चार्ज करता येते. Xiaomi चा दावा आहे की, हा इलेक्ट्रिक एअर कंप्रेसर कारचा टायर फक्त सहा मिनिटांत हवेने फुगवू शकतो, तर सायकल फुगवायला तीन मिनिटे लागतील.