बेंगळुरू स्थित स्टार्ट-अप प्रविगची इलेक्ट्रिक एसयूव्ही बाजारपेठेत पुढल्या महिन्यात म्हणजेच नोव्हेंबरमध्ये सादर होणार आहे. स्टार्टअप आपली इलेक्ट्रिक एसयूव्ही २५ नोव्हेंबर २०२२ ला लॉन्च करेल आणि त्यानंतर लवकरच ही कार बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होईल. ही इलेक्ट्रिक एसयूव्ही लाँच करण्यापूर्वी कंपनीने त्याचा टीझर रिलीज केला आहे, ज्यामध्ये या कारच्या एक्सटीरियर आणि डिझाइनबद्दल बरीच माहिती दिली जात आहे.

टीझरनुसार, इलेक्ट्रिक एसयूव्हीला मागील संपूर्ण रुंदीवर एक टॅपर्ड लाइटबार मिळतो. फ्रंटला देखील हेडलॅम्पसारखेच डिझाइन असेल. डाव्या मागील फेंडरवर चार्जिंग पोर्ट आहे. दरवाजाचे हँडल खूपच मनोरंजक दिसतात. ५ स्पोक अलॉय व्हील्स देखील आहेत.

आणखी वाचा : मर्सिडीझ मेड इन इंडिया पहिली इलेक्ट्रिक कार लाँच; जाणून घ्या किंमतीपासून फीचर्सपर्यंत बरचं काही…

वैशिष्ट्ये

या एसयूव्हीला ऑन-बोर्ड WiFi,लॅपटॉपसाठी १५ इंच डेस्क, लिमोझिन पार्टीशन, चार्जिंग डिव्हाइसेससाठी २२० वॉल्ट सॉकेट, PM २.५ एअर फिल्टरसह हवा गुणवत्ता निर्देशांक, व्हॅनिटी मिरर, USB सॉकेट मिळेल. आणि यात वायरलेस चार्जिंगसह प्रीमियम साउंड सिस्टम असेल. ही कार स्क्रीन MirrorLink ला सपोर्ट करेल. मात्र, कार लॉन्च झाल्यानंतरच त्याचे सर्व फिचर्स दिसणार आहेत.

ही कार २०० किमी प्रति तास वेगाने एका चार्जमध्ये ५०० किमीची रेंज कव्हर करेल, असा दावा प्रविगने केला आहे. ती ४.३ सेकंदात ० ते १०० किमी प्रतितास वेग वाढवण्यास सक्षम असेल. या कारमधील बॅटरी पॅक १० लाख किमी पर्यंत असण्याचा अंदाज आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने, इलेक्ट्रिक एसयूव्हीला ५ स्टार रेटिंग दिले जाईल. कंपनी वाहनात सिल्क स्मूथ सस्पेंशन उपलब्ध करून देईल अशी अपेक्षा आहे.

Story img Loader