द्रौपदी मुर्मू या नवनिर्वाचित व भारताच्या राष्ट्रपती म्हणून शपथ घेणाऱ्या भारताच्या पहिल्या आदिवासी नेत्या आहेत. त्यांचे अधिकृत अध्यक्षीय वाहन (official Presidential vehicle) म्हणून मर्सिडीज-बेंझ S600 पुलमन गार्ड (Mercedes-Benz S600 Pullman Guard) सारखी आलिशान कार वापरली जाते. या कारमध्ये काच वापरून प्रवाशांना ड्रायव्हरच्या सीटपासून वेगळे ठेवले जाते. या कारची किंमत तब्बल नऊ कोटी इतकी असून, ही भारतातील सर्वांत सुरक्षित वाहनांपैकी एक मानली जाते. अगदी अलीकडेच द्रौपदी मुर्मू या कारमधून राष्ट्रपती भवन (President’s House) ते संसदेपर्यंत प्रवास करताना दिसल्या होत्या.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे अधिकृत वाहन

भारताच्या १५ व्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या VVIP वाहतुकीसाठी विशेष कार वापरली जाते. ही कार मर्सिडीज-बेंझ S600 पुलमन गार्ड (Mercedes-Benz S600 Pullman Guard) आहे. या कारमध्ये राष्ट्रपती मुर्मू यांना कोणत्याही हानीपासून वाचविण्यासाठी प्रगत सुरक्षा वैशिष्ट्ये समाविष्ट करण्यात ली आहेत. ही कार स्फोटक-प्रतिरोधक (Explosive Resistant Vehicles 2010-level) आहे आणि बंदुकीचा गोळीबार व इतर हल्ल्यांचा प्रतिकार सहन करता यावा यासाठी या कारला (VR9-level protection) आर्मर प्लेटिंग करण्यात आले आहे. ही आर्मर्ड लक्झरी कार २ मीटर अंतरावरून १५ किलोग्रॅम टीएनटीच्या स्फोटाचा सामना करू शकते.” तसेच – AK-47 रायफलमधून गोळ्या झाडल्या गेल्या तरी त्या या कारच्या काचेमधून आतील विशेष व्यक्तीपर्यंत पोहचू शकणार नाहीत. ही काच शक्तिशाली लष्करी दर्जाचे शस्त्र मानल्या जाणाऱ्या रायफलमधून सोडलेल्या बुलेटनाही रोखते.

Offensive post about Mahatma Gandhi on social media in buldhana
बुलढाणा : राष्ट्रपिता महात्मा गांधींबद्दल आक्षेपार्ह ‘पोस्ट’! युवक सत्ताधारी पक्षाचा…
4th October Rashi Bhavishya in marathi
४ ऑक्टोबर पंचांग: मेष, वृषभसह ‘या’ राशींवर देवी…
CM Siddaramaiah Viral Video
तिरंग्याचा अवमान? राष्ट्रध्वज हातात घेऊन त्यानं मुख्यमंत्र्यांचे बूट काढले; व्हायरल व्हिडीओ नंतर होतेय टीका
Tembhu Yojana sixth phase BJP and Ajit Pawar group members ignored farmers meeting organized by Shiv Sena Shinde group
मुख्यमंत्र्यांच्या मेळाव्याकडे महायुतीतील भाजप, राष्ट्रवादीची पाठ
congress mp praniti shinde alleged plastic mixed rice distributed to ration card holders
प्लास्टिक तांदूळ खाण्यास मारक की पोषक? खासदार प्रणिती शिंदे यांच्या आरोपाने वाद; प्रशासनाचा अनुकूल दावा
First Secretary of the Permanent Mission of India to the United Nations, Bhavika Mangalanandan
Who is Bhavika Mangalanandan : पाकिस्तानच्या पंतप्रधानांना सुनावणाऱ्या भाविका मंगलानंदन कोण आहेत? संयुक्त राष्ट्राच्या महासभेत भारताचं केलं प्रतिनिधित्व
Bhoomipujan of Bhidewada National Memorial by pm Modi Criticism of Sharadchandra Pawar NCP Party
भिडेवाडा राष्ट्रीय स्मारकाचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते भूमिपूजन, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची टीका
Bhumi Pujan of Amravati s Textile Park
अमरावतीच्या टेक्सटाईल पार्कचे दुसऱ्यांदा भूमिपूजन, नाना पटोले यांचा आरोप

मर्सिडीज-बेंझ S600 पुलमन गार्ड कारची किंमत अंदाजे नऊ कोटी रुपये इतकी आहे. अतिरिक्त सुरक्षा वैशिष्ट्यांमध्ये रन-फ्लॅट टायर्स समाविष्ट आहेत. हे टायर खराब झाले किंवा पंक्चर झाले तरीही कार चालू राहू शकते आणि धोकादायक स्थितीतून पटकन बाहेर पडण्यास कारला मदत करते. त्याला सेल्फ-सीलिंग इंधन टँक आहे; ज्यामुळे टाकीमधून इंधन गळती होण्यापासून रोखणे शक्य होते आणि खराब झाल्यानंतर आग किंवा स्फोट होण्याचा धोका कमी करते. तसेच या कारमध्ये अग्निशमण यंत्रणादेखील आहे; जी इंजिन किंवा कारच्या इतर भागात उदभवू शकणारी आग स्वयंचलितपणे शमवते.

हेही वाचा – पुण्यात लाँच झाली सीएनजी बाईक, नितीन गडकरींच्या हस्ते उद्घाटन! काय आहे खासियत? किती आहे किंमत?

माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे अधिकृत वाहन

राम नाथ कोविंद हे भारताचे १४ वे राष्ट्रपती होते आणि त्यांच्या कार्यकाळात ते मर्सिडीज-बेंझ S600 पुलमन गार्ड (Mercedes-Benz S600 Pullman Guard) ही कार अधिकृत वाहन म्हणून वापरत होते. १४ ऑगस्ट २०२१ पर्यंत राष्ट्रपती कोविंद यांनी मर्सिडीज-बेंझ S600 पुलमन गार्ड W221 मॉडेलवर आधारित कार वापरली. ही कार दिवंगत प्रणव मुखर्जी भारताचे राष्ट्रपती असताना राष्ट्रपतींच्या सेवेसाठी अधिकृत वाहन म्हणून समाविष्ट करण्यात आली होती.

हेही वाचा – Ertiga, Carens चे धाबे दणाणले! एकेकाळी हिंदी चित्रपटांमध्ये दिसणारी ‘ही’ कार नव्या अवतारात देशात दाखल होणार, किंमत…

भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांचे अधिकृत वाहन:

भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या कार्यकाळात त्यांनी सुरुवातीला मर्सिडीज-बेंझ एस-क्लास W140 (Mercedes-Benz S-Class W140) ही कार वापरली. नंतर W221 S-क्लास S600 पुलमन लिमोझिन (W221 S-Class S600 Pullman limousine ही कार वापरली होती.

डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचे अधिकृत वाहन:

डॉ. एपीजे अब्दुल कलाम हे भारतातील सर्वांत लोकप्रिय राष्ट्रपतींपैकी एक होते. त्यांनी २००२ ते २००७ पर्यंत ११ वे राष्ट्रपती म्हणून काम केले होते. ‘पीपल्स प्रेसिडेंट’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कलाम यांनीदेखील मर्सिडीज बेंझ एस-क्लास W140 (Mercedes Benz S-Class W140) वापरली होती. २००७ मध्ये त्यांचा कार्यकाळ संपल्यावर त्यांनी पुन्हा हिंदुस्थान Ambassador कार वापरण्यास सुरवात केली. त्यांना ऑटोमोबाइल्स आणि तंत्रज्ञानामध्ये खूप स्वारस्य होते आणि भारताचे जीवाश्म इंधनावरील अवलंबित्व कमी करण्यासाठी त्यांनी हायब्रीड कारच्या महत्त्वावर सतत भर दिला होता.