Droupadi Murmu Official Car: भारत जगातील सार्वभौम आणि एक शक्तीशाली देश आहे. द्रौपदी मुर्मू भारताच्या १५व्या राष्ट्रपती आहेत. भारताचे राष्ट्रपती हे भारतीय प्रजासत्ताक राज्याचे प्रमुख आहेत. भारतामध्ये राष्ट्रपती हे सर्वोच्च संविधानिक पद असून ते देशाच्या कार्यकारी मंडळाचे नाममात्र प्रमुख असतात. त्याचबरोबर ते देशाचे प्रथम नागरिक व भारतीय सशस्त्र दलांचे सरसेनापती (कमांडर-इन-चीफ) असतात. म्हणूनच कुठल्याही संकटाच्या परिस्थितीत राष्ट्रपती हे सुरक्षित असावेत, त्यासाठी त्यांच्यासाठी एक ‘खास’ वैशिष्ट्येपूर्ण अशी कार तयार करण्यात आली आहे. या कारमध्ये प्रत्येक टेक्नोलॉजीमधील एकदम टॉपची फीचर्स दिले आहेत. चला तर जाणून घेऊया राष्ट्रपतींच्या कारमध्ये काय आहे खास..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

राष्ट्रपतींकडे कोणती आहे कार?

देशाच्या राष्ट्रपतींकडे जगातील सर्वात सुरक्षित कारपैकी एक आहे. भारताच्या राष्ट्रपतींची कार मर्सिडीज कंपनीची आहे, तिला S600 Pullman Guard लिमोझिन म्हणतात. ही जगातील सर्वात सुरक्षित कार मानली जाते.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची कार कशी आहे खास

देशाच्या राष्ट्रपतींची सुरक्षा ही देशातील सर्वात महत्त्वाची असते आणि हे पाहता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची कार देखील जगातील सर्वात सुरक्षित कारपैकी एक आहे, ज्यामध्ये प्रत्येक गोष्टीची विशेष काळजी घेण्यात आली आहे. त्यांच्यासाठी डिझाइन केलेल्या कारमधील प्रत्येक तंत्रज्ञान उच्च दर्जाचे आहेत.

(हे ही वाचा: बाईकप्रेमींनो! देशात या महिन्यात लाँच होणार स्टायलिश अन् पॉवरफुल ‘या’ शानदार बाईक्स, पाहा यादी )

Mercedes-Benz S600 Pullman Guard

Mercedes-Benz S600 Pullman Guard नावाच्या या कारवर कोणत्याही स्फोटकांचाही परिणाम होत नाही. या गाडीची रचना इतकी मजबूत आहे, की एके ४७ मधून चालवलेल्या गोळ्यांपासून आतमध्ये बसलेल्या व्यक्तीचा बचाव होऊ शकतो. २ मीटर अंतरावरून १५ किलोपर्यंतच्या TNT स्फोटकांचा या कारवर काहीही परिणाम होत नाही.

कारची किंमत

Mercedes-Benz S600 २०१५ मध्ये भारतात लॉन्च करण्यात आली. देशाच्या राष्ट्रपतींकडे असलेली जगातील सर्वात सुरक्षित कारची किंमत सुमारे ९ कोटी रुपये आहे.

जगातील सर्वात सुरक्षित कार

या कारमध्ये सेल्फ-सीलिंग इंधन बसवण्यात आले आहे. या कारवर कोणत्याही प्रकारचा हल्ला झाला तरी कारमधून इंधन कधीच गळणार नाही. यासोबतच या गाडीचा टायरही कधीच पंक्चर होत नाही. कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीत आत बसलेली व्यक्ती पूर्णपणे सुरक्षित असते, त्याला एक इंचही दुखापत होऊ शकत नाही.