बुलेटचा भारतात एक मोठा चाहतावर्ग आहे. बुलेटची क्रेझ तर कॉलेज कुमारांपासून ते साठीतल्या आजोबांपर्यंत सगळ्यांमध्येच पाहायला मिळते. प्रत्येकाला असं वाटतं की, माझ्याकडेही एक बुलेट असायला हवी. कित्येक लोकांना ही बुलेट आवडते. परंतु Bullet 350cc ची किंमत १.१२ लाख रुपये असल्यामुळे ती सर्वसामान्यांना घेणे परवडत नाही, पण तुम्हाला माहिती आहे का, Bullet 350cc ची किंमत ऐकेकाळी फारच कमी होती. या बुलेटचा जुना बिल सध्या सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल होत आहे. हा बिल पाहून तुम्हालाही धक्का बसणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

१९८६ चे ‘हे’ बिल होतेय व्हायरल

१९८६ मधील एक बिल सोशल मीडियावर सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. एका बाईकप्रेमीच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा बिल शेअर करण्यात आला आहे. यावर अनेक बुलेट रायडर्स कमेंट करत आहेत. हे बिल सुमारे ३६ वर्ष जुने आहे. व्हायरल बिलानुसार हे बिल १९८६ चे आहे. सध्या हे बिल झारखंडच्या कोठारी मार्केटमध्ये असलेल्या अधिकृत डीलरचे असल्याचे सांगितले जात आहे.

(हे ही वाचा : Mercedes, Audi luxury cars आता ‘इतक्या’ स्वस्तात; पाहा हा घसघशीत आॅफर कुठे मिळतोय )

ऐकेकाळी Bullet 350cc किंमत होती फक्त…

या बिलानुसार, त्यावेळी बुलेट ३५० सीसी मोटरसायकलची ऑन रोड किंमत १८,८०० रुपये होती. सवलतीनंतर फक्त १८,७०० रुपये होती. विश्वास बसत नसेल ना, पण हे खरं आहे. हे बिल २३ जानेवारी १९८६ चे आहे. बुलेटप्रेमी हे बिल सोशल मीडियावर शेअर करत आहेत. इंस्टाग्रामवर या पोस्टवर आतापर्यंत १९ हजारांहून अधिक लाईक्स आले आहेत. यावर मोठ्या संख्येने लोक कमेंट करत आहेत.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Price of bullet 350cc just rs 18700 you can also see the bill pdb