जास्त पॉवर असलेल्या बाईकला बाजारात मोठी मागणी आहे. म्हणूनच १२५cc सेगमेंटमध्ये अनेक बाईक बाजारात ग्राहकांसाठी उपलब्ध आहेत. एक किंवा दोन कंपन्या वगळता जवळपास सर्व दुचाकी कंपन्या त्यांच्या १२५cc बाईक विकत आहेत. Hero MotoCorp ही १२५cc बाईकची सर्वात मोठी उत्पादक आहे आणि या विभागातील जास्तीत जास्त मॉडेल्सची विक्री देखील करते. Hero व्यतिरिक्त, Honda देखील दोन बाइक्सच्या मदतीने १२५cc सेगमेंटवर राज्य करत आहे. मात्र, आता एका मोठ्या कंपनीने दोघांनाही तगडे आव्हान दिले आहे, त्यामुळे हिरो आणि होंडा यांचं टेंन्शन वाढलं आहे.
वास्तविक, सर्वाधिक बाईक विकणाऱ्या Hero MotoCorp चा १२५cc सेगमेंटमध्ये बजाजच्या पल्सर १२५ ने पराभव केला आहे. १२५cc बाईकच्या विक्रीत एकेकाळी अव्वल स्थानावर असलेल्या Hero MotoCorp ला Bajaj Pulsar 125 ने मागे टाकले आहे. सप्टेंबर २०२३ मध्ये Hero Glamour आणि Super Splendor ची एकूण विक्री बजाज पल्सर 125 पेक्षा कमी होती. या कालावधीत बजाज पल्सर 125 ची एकूण विक्री ६७,२५६ युनिट्स झाली.
(हे ही वाचा : Innova, Scorpio विसरुन जाल, देशात आली सर्वात स्वस्त १४ सीटर गाडी, मोठ्या कुटुंबियांसाठी आहे बेस्ट )
६ महिन्यांत ४ लाखांहून अधिक विक्री!
जर आपण आकडेवारीवर नजर टाकली तर, गेल्या सहा महिन्यांत बजाज पल्सर 125 ची विक्री चांगली झाली आहे. यावर्षी पल्सर 125 ची एप्रिलमध्ये ७८,७९९ युनिट्स, मेमध्ये ८७,०७१ युनिट्स, जुलैमध्ये ६७,१३४ युनिट्स, जुलैमध्ये ५०,७३२ युनिट्स, ऑगस्टमध्ये ५२,१२९ युनिट्स आणि सप्टेंबरमध्ये ६७,२५६ युनिट्सची विक्री झाली आहे. शाईन १२५ नंतर, पल्सर १२५ ही या सेगमेंटमध्ये सर्वाधिक विक्री होणारी १२५cc बाईक बनली आहे. बजाज १२५cc सेगमेंटमध्ये Pulsar 125 आणि Pulsar NS 125 ची विक्री करत आहे. बाजारात, दोन्ही बाईक्स Hero Glamour, Super Splendor, Honda Shine 125, SP 125 आणि TVS Raider 125 यांच्याशी स्पर्धा करतात.
कंपनीच्या वेबसाइटनुसार, पल्सर 125 निऑन सिंगल सीट आणि कार्बन फायबर स्प्लिट सीट एडिशन या दोन प्रकारांमध्ये विकली जात आहे. Pulsar 125 ची किंमत ८४,०१३ रुपयांपासून सुरू होते आणि ९४,१३८ रुपये (एक्स-शोरूम) पर्यंत जाते. बाईकचे मायलेज ५०-५५ किलोमीटर प्रति लिटर आहे.