पुण्याची स्टार्टअप कंपनी टोर्क क्राटोसने भारतात एक इलेक्ट्रिक टू व्हीलर लाँच केली होती. भारतात टोर्क क्राटोसने इलेक्ट्रिक बाईक दोन प्रकारात म्हणजेच एक क्राटोस आणि दुसरी क्राटोस आर या नावाने सादर केल्या होत्या. या मोटारसायकलींना स्पोर्टी लूक देण्यात आला आहे. तर वर्षाअखेरीस म्हणजेच आज ३१ डिसेंबरला टोर्क कंपनी ग्राहकांसाठी खास ऑफर घेऊन आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

असा होईल फायदा :

वर्षाअखेरीस तुम्ही इलेक्ट्रिक बाईक खरेदी करण्याचा विचार करत असाल तर टोर्क मोटर्स त्यांच्या फ्लॅगशिप इलेक्ट्रिक मोटारसायकलवर भरघोस सवलत देत आहे. इलेक्ट्रिक वाहन (EV) स्टार्टअप क्राटोस आरवर ( Kratos R) ३२,५०० रुपयांपर्यंत फायदे देत आहे ; ही ऑफर आज ३१ डिसेंबरपर्यंत ग्राहकांसाठी लागू असणार आहे. वर्षाअखेरीस कंपनी या दुचाकीवर २२,००० रुपयांपर्यंत डिस्काउंट, याशिवाय टोर्क कंपनी आपल्या ग्राहकांना १०,५०० रुपये किमतीच्या सेवा ऑफर करते; ज्यात वॉरंटी, डेटा चार्जेस, Periodic सेवा शुल्क आणि चार्जपॅक आदींचा समावेश आहे. क्राटोस आर अरबन आणि स्टँडर्ड अशा दोन प्रकारांमध्ये ऑफर केली जाते. पहिल्याची किंमत १.६८ लाख रुपये आहे, तर दुसऱ्याची किंमत १.८७ लाख एक्स शो रूमची किंमत आहे. दोन्ही व्हेरिएंट पांढरा, निळा, लाल आणि काळा या चार रंगांमध्ये उपलब्ध असतील.

हेही वाचा…८ लाखाच्या मारुतीच्या ‘या’ एसयूव्हीनं Nexon, चं वर्चस्व संपवलं! झाली तुफान विक्री, १० लाखांहून अधिक लोकांनी केली खरेदी

टोर्क क्राटोस आरचे स्पेक्स आणि फिचर :

क्राटोस आर ९ केडब्ल्यू १२ बीएचपी 9kW (12 bhp) इलेक्ट्रिक मोटारद्वारे समर्थित आहे, जे ३८एनएम (38 Nm) चे पीक टोर्क जनरेट करते आणि 4kWH, IP67 प्रमाणित, लिथियम-आयन बॅटरी पॅकमधून त्याची ऊर्जा प्राप्त करते. ही इलेक्ट्रिक बाइक एका चार्जमध्ये १८० किमीची रेंज देईल. परफॉर्मन्ससाठी क्राटोस आर १०५ किमी प्रतितास टॉप स्पीड क्लॉक करून ३.५ सेकंदात ० ते ४०० किमी प्रतितास वेग वाढवू शकते. दोन्ही व्हेरिएंट्समध्ये स्टँडर्ड फिचर्स आहेत. ज्यात फुल-एलईडी लाइटिंग, पूर्ण डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, मल्टिपल राइड मोड, रिजनरेटिव्ह ब्रेकिंग, रिव्हर्स मोड, मोबाइल कनेक्टिव्हिटी, यूएसबी चार्जिंग, अँटी-थेफ्ट, फ्रंट स्टोरेज बॉक्स, ओटीए अपडेट्स आदी बऱ्याच गोष्टी आहेत.