शक्तिशाली इंजिन असलेल्या बाईक्ससाठी रॉयल इन्फिल्ड आणि होंडा या वाहन कंपन्या लोकप्रिय आहेत. मात्र, त्यांना चीन येथील बाईक निर्मिती कंपनी क्युजे मोटरचे तगडे आव्हान मिळण्याची शक्यता आहे. क्युजे मोटरने भारतासाठी चार बाईक्स सादर केल्या आहेत. यामध्ये एसआरसी २५०, एसआरव्ही ३००, एसआरके ४०० आणि एसआरसी ५०० या बाईक्सचा समावेश आहे.
१) क्युजे मोटर एसआरसी २५०
QJ Motor SRC 250 या बाईकला रेट्रो स्टाईल लूक मिळाले आहे. बाईकमध्ये गोलाकार हेडलँप मिळते. इंजिनबाबत बोलायचे झाले तर बाईकमध्ये २४९ सीसी ट्विन सिलेंडर इंजिन देण्यात आले आहे जे १७.५ एचपीची शक्ती आणि १६.५ एनएमचा टॉर्क निर्माण करते. ही बाईक २५० सीसी सेगमेंटमधील पल्सर २५०, डोमिनार २५०, केटीएम ड्युक २५० ला टक्कर देऊ शकते. बाईकमध्ये सिंगल पॉड इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, टेलिस्कोपिक फ्रंट फोर्क आणि डिस्क ब्रेक मिळतात.
(फोल्ड करून कुठेही न्या ‘ही’ ई बाईक, ५५ किमी रेंज, जाणून घ्या भन्नाट फीचर्स)
२) क्युजे मोटर एसआरव्ही ३००
QJ Motor SRV 300 मध्ये २९६ सीसी व्हीट्विन इंजिन मिळते जे ३० एचपीची शक्ती आणि २६ एनएमचा टॉर्क निर्माण करते. बाईकमध्ये अक्रोडच्या आकाराचे फ्युअल टँक, गोलाकार हेडलॅम्प आणि इनव्हर्टेड फ्रंट फोर्क मिळतात. बाईकमध्ये ड्युअल रिअर अब्झॉर्बर्स, साईड माउन्टेड एकझॉस्ट आणि ड्युअल चॅनल एबीएससह डिस्क ब्रेक मिळतात.
३) क्युजे मोटर एसआरके ४००
QJ Motor SRK 400 बाईमध्ये ४०० सीसीचे पॅरेलल ट्विन इंजिन देण्यात आले आहे जे ४१ एचपीची शक्ती आणि ३७ एनएमचा टॉर्क निर्माण करते. वाहनाला स्पोर्टी लूक असून त्यात स्प्लिट सीट, एलईडी टेल लॅम्प, मोठा हँडलबार आणि डीआरएलसह ड्युअल प्रोजेक्टर हेडलॅम्प देण्यात आले आहेत. फीचरच्या बाबतीत बोलायचे झाल्यास वाहनात ड्युअल चॅनल डिस्क ब्रेकसह, साईड माउन्डेट मोनो शॉक युनिट आणि इनव्हर्टेड फ्रंट फोर्क मिळतात. ही बाईक केटीएम आरसी ३९०, केटीएम ३९० ड्युकला आव्हान देऊ शकते.
४) क्युजे मोटोर एसआरसी ५००
QJ Motor SRC 500 मध्ये ४८० सीसीचे सिंगल सिलेंडर इंजिन मिळते जे २५.५ एचपीची शक्ती आणि ३६ एनएमचा टॉर्क निर्माण करण्यासाठी सक्षम आहे. या बाईकलाही गोलाकार हेडलँप देण्यात आले आहे. बाईकमध्ये रिब्ड पॅटर्न सीट, स्लिक टेल लँप, ड्युअल रिअर शॉक अब्झॉर्बर, ड्युअल पॉड इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, टेलिस्कोपिक फ्रंट फोर्क देण्यात आले आहेत.
पुरवठ्यासाठी कंपनीने आदिश्वर ऑटो राइड इंडियासह बेनेली, कीवे आणि झोन्टेससोबत भागीदारी केली आहे, जे देशभरातील ४० डिलरशीपद्वारे ग्राहकांना सेवा पुरवतात.